मुख्याध्यापक पंजाबराव शिंदे सेवापुर्ती निमित्त विद्यालयातर्फे भव्यसत्कार

29

🔹भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वात सेवा पूर्ण झाली

✒️सिद्धार्थ दिवेकर(उमरखेड प्रतिनिधी)

उमरखेड(दि.31ऑगस्ट):- रोज मंगळवारला ज्ञानदीप विद्यालय, बेलखेड ता. उमरखेडच्या भव्यप्रांगणात स. ठीक2.00 वा. सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी युवराज पाटील देवसरकर तर प्रमुख उपस्थिती सौ. प्रियंकाताई युवराज देवसरकर नारायणराव कदम श्री पंजाबराव विठ्ठलराव शिंदे मुख्याध्यापक ज्ञानदीप विद्यालय, बेलखेड. यांना ज्ञानप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ, उमरखेडचे विद्यमान संस्थाध्यक्ष श्री प्रकाश पाटील देवसरकर यांनी व भाऊसाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनात प्रथमता भगवती देवी विद्यालय, देवसरी येथे 21/11/1992 सेवा करण्याची संधी दिली.आणि मुख्याध्यापक श्री प्रल्हादराव मिरासे व त्यांच्या टीम सोबत शा. शि.म्हणून 09/ 11/ 1997 पर्यंत अध्यापन केले. व पदोन्नती झाल्यावर10/11/ 1997 ते 31 /08/ 2022 पर्यंत मुख्याध्यापक पदावर त्यांनी हसत खेळत दिलखुलास आपल्या कर्तव्य
स्वीकारून 25 वर्षे पूर्ण केली.

विद्यालयात कार्यप्रणाली मध्ये स्वतःस्काऊट शिक्षक असल्यामुळे त्यांनी5 वेळा जिल्हास्तरावर स्काऊटकॅम्प मध्ये सहभाग घेतला. त्यामध्ये 2006साली ज्ञानदीप विद्यालय, बेडखेड दिगंबर माने स्काऊट शिक्षक व स्काऊट संघाला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले. तत्कालीन शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरकेच्या हस्ते बक्षीस स्वीकारले. त्याचबरोबर लेझीम पथकात अनेक वेळा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन दाखवले. तर विद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन करत होते. या पूर्ण सेवेत उत्कृष्ट सहकार्य प्रमोद दुधे मुख्याध्यापक ज्ञानप्रकाश विद्यालय, सुकळी यांचे लाभले. शिंदे सरच्या मार्गदर्शनात मागील महिन्यात विद्यालयाचा एनएमएसएस परीक्षा निकाल लागला त्यामध्ये विद्यालयाचे दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये चार विद्यार्थी पात्र ठरले. अंजली पाईकराव अनुष्का जाधव शिवानी ठाकरे महेश धुमाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. ही एक गौरवाची बाब आहे. 2017 पासून विद्यालयात एसएससी परीक्षेत द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यास आजीबाई पार्वतीबाई बळीराम शिंदे रा.नेवरी ता. हदगाव यांच्या स्मृतीला उजाळा म्हणून 500/रु.बक्षीस दरवर्षी 15 ऑगस्टला देण्यात येते. सरांचे कार्य विद्यार्थी कर्मचारीप्रिय असे होते.

स्वभाव अतिशय मनमिळावू सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे संघटन कौशल्य त्यांच्यामध्ये होते.विद्यालयाच्या वतीने उभयतांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर प्रमोद दुधे विजय गावंडे चक्रधर देवसरकर यांचा सत्कार करण्यात आला.ह्या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना शिंदे सरांनी विद्यालयातील विद्यार्थी गावकरी व कर्मचारी यांनी माझा व माझी धर्मपत्नी सौ. सीमा पंजाबराव शिंदेचा सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. पुढील सेवा माझी समाज हितासाठी राहील व वेळोवेळी संस्थेला सहकार्य करीन असे गौरवउद्गार त्यांनी काढले.

तर सत्कार सोहळ्याला सौ. सुषमा साखरे (पाटील)संजय गोवंदे श्रीकृष्ण कत्तुलवाड बंडू तावडे विलासराव वानखेडे बबनराव कदम शेख गुलाब किशोर जाधव व बेलखेड येथील ग्रामस्थ व विद्यालयातील विद्यार्थ्यांची भरगच्च उपस्थिती होती. कार्यक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री वानखेडे सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन तावडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न श्रीकृष्ण कत्तुलवाड यांनी घेतले. व सर्वांनी भोजन करून कार्यक्रमाची सांगता झाली.