उमरखेड रिपब्लिकन युवा सेनेच्या निवेदनाची पोलीस आयुक्तांनी घेतली दखल

30

🔸”कुठल्याही आंदोलनाची गरज नसुन आपण दिलेल्या निवेदनाबद्दलच अधिकारी वर्गाशी चर्च्या झाली व तातडीने लोकार्पण करण्यात येईल अशी मी आपणांस ग्वाही देतो” – पोलीस आयुक्त

🔹मा. पोलीस आयुक्त पोलीस स्टेशन व सदनिकेची प्रत्यक्ष पाहणी करतांना व निवेदन देताना शिष्टमंडळ

✒️सिध्दार्थ दिवेक (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 31ऑगस्ट):-रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब यांना 24 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन डि.जी. ऑफिस मुंबई तसेच आय.जी. ऑफिस अमरावती येथे पत्रव्यवहार करण्यात आला होता. 2 सप्टेंबर शुक्रवार रोजी रिपब्लिकन युवा सेनेचे शिष्टमंडळ आय.जी. ऑफिस अमरावती येथे प्रत्यक्ष आय.जी साहेबांची भेट घेण्यासाठी जाणार होते तत्पूर्वी सदर झालेल्या पत्रव्यवहाराची दखल घेऊन अमरावती विभागाचे पोलीस आयुक्त मा. चंद्रकिशोरजी मीना साहेब यांनी आज रोजी उमरखेड येथे येऊन पोलीस हाउसिंग डिपार्टमेंट अंतर्गत झालेल्या व बांधकाम पूर्ण होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटून गेलेल्या पोलीस स्टेशन व पोलीस सदनिकेची पाहणी केली.

रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने मा. पोलीस आयुक्त साहेब यांची भेट घेऊन सदर विषयी आग्रही भुमिका मांडुन निवेदनातून आंदोलनाचा ईशारा देत असता “कुठल्याही आंदोलनाची गरज नसुन आपण दिलेल्या निवेदनाबद्दलच अधिकारी वर्गाशी चर्च्या झाली व तातडीने लोकार्पण करण्यात येईल अशी मी आपणांस ग्वाही देतो” असे आश्वासन आज रोजी मा. पोलीस आयुक्त साहेब यांनी दिले.

ह्यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिलीपजी भुजबळ साहेब, विभागीय पोलीस अधिकारी मा. प्रदीपजी पाडवी साहेब, उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. अमोलजी माळवे साहेब व तसेच अमरावती विभागातील पोलीस अधिकारी व उमरखेड येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

तसेच रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, ता.अध्यक्ष गौतम नवसागरे, ता.उपाध्यक्ष भीमराव खंदारे, ता.संघटक संदीप राऊत, ता.सहसचिव साहेबराव कदम, तीवडी शाखाप्रमुख बबन सूर्यवंशी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.