


✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193
अमरावती(दि.31ऑगस्ट):-महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर द्वारे एक दिवसीय “मॅथेमॅटिकस रिडींग अँड रायटिंग ” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. गणित हा विषय फक्त सूत्रे, आकडे, प्रमेय यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे गणित मध्ये चिन्हांना जास्त महत्व आहे. तेव्हा चिन्हांशिवाय गणित वाचणे अशक्य आहे. गणित शिकत असतांना गणित जर वाचता आले तर ते लवकर समजते. समीकरणातील अंक व अल्फाबेट यांच्यातील संबंध लवकर समजतो. तेव्हा विज्ञान स्नातक भाग -१ च्या विद्यार्थ्यांना गणिताची बाराखडी पूर्णपणे ओळख व्हावी याकरीता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उदघाटनाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका भिसे या उपस्थित होत्या.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना गणितातील विज्ञान स्नातक या वर्गा करिता लागणारे सगळे चिन्हे , प्रतीके व समीकरणे यांची माहिती देण्यात आली. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विज्ञान स्नातक भाग -३ ची विद्यार्थिनी कु. दामिनी धागे हिने वरील माहिती प्रस्तुत केली. दुसऱ्या सत्रात कु आदिबा खान हिने प्रतीकांचा वापर करून गणिताची वाक्ये तयार करायला शिकविली. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित शिकणे सुकर होईल.
विद्यार्थ्यांनी आपल्या अभिप्राया मध्ये नमूद केले कि, त्यांना या कार्यशाळेमुळे नवनवीन प्रतीकांची ओळख झाली व गणित वाचता येत असल्यामुळे ते सोडवता येत असल्याचे समाधान या कार्यशाळेमुळे वाटले. या कार्यशाळेला महाविद्यालयातील गणित विभागाचे डॉ प्रीती देशमुख व डॉ अभिजित बनसोड यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला एकूण ४८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . या कार्यशाळेच्या आयोजन व यशस्वीतेकरिता महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ अलका भिसे व आय क्यू ए सी समन्वयक डॉ सुचिता खोडके यांनी खूप शुभेच्छा दिल्या.




