ब्रम्हपुरी जिल्हा होणे ही जन सामान्यांची गरज- स्थानिक आमदार, खासदार, मंत्री नसल्याने ब्रम्हपुरी जिल्हा बनण्यापासून वंचित का?

80

🔹मोठ्या धंदेवाल्यांना ब्रम्हपुरी जिल्हा नाही पाहिजे का?

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.31ऑगस्ट):- आज ब्रम्हपुरी म्हटलं की सर्वच बाबतीत विकासाच्या मार्गाने वेगात धावत आहे. मग ते शिक्षण असो की दवाखाने वा धंदे असोत, आज ब्रम्हपुरी एक विकसित शहर म्हणून ओळखल्या जाते. नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ मध्ये ब्रम्हपुरी शहराचा शिक्षणाच्या बाबतीत एक वेगळाच दबदबा बघायला मिळतो. ब्रम्हपुरी ला असलेलं सरकारी तंत्र विद्यानिकेतन (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक) हे एकमेव प्रसिद्ध तंत्र शिक्षण ब्रम्हपुरी मध्ये प्रसिद्ध आहे. दूर – दूर पर्यंत प्रसिद्ध म्हणजे ब्रम्हपुरीचे दवाखाने अतिशय आरोग्यासाठी सोहिस्कर असलेलं एकमेव ठिकाण म्हणजे ब्रम्हपुरी. शिक्षण , दवाखाने, बाजारपेठ, पर्यटन स्थळ या सर्व बाबी असताना ब्रम्हपुरी शहराला जिल्हा बनविण्यापासून का बरं वगळल्या जात आहे हा जनसामान्यांमध्ये प्रश्न खूप दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे.

ब्रम्हपुरी चे स्थानिक आमदार ,खासदार, मंत्री नसल्यामुळे ब्रम्हपुरी कडे लक्ष दिले जात नसेल काय? अशा कुजबुज नागरिकांकडून ऐकायला मिळत आहेत. जर ब्रम्हपुरी जिल्हा झाला पाहिजे एवढ्या गोष्टी जनसामान्यांना अस वाटत असेल तर बलाढ्य राजकीय लोकांना का वाटू नये?ब्रम्हपुरी ही फक्त राजकीय लोकांना व मोठ्या धंदेवाल्याना पैसा कमविण्यापूर्तीच आवडत असेल काय? सर्व सुविधा व एक विकसित शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं ब्रम्हपुरी भविष्यात जिल्हा होईल का ही चर्चा नागरिकांच्या ओठावर खेळतच आहे.
———————————————-
जाणून घ्या ब्रम्हपुरीकरांच्या प्रतिक्रिया

“ब्रम्हपुरी जिल्हा झाला तर ब्रम्हपुरी आणि परिसरातील पक्षकारांना 125 किमी दूर चंद्रपुरला येणे जाने करावे लागणार नाही.आज कोणत्याही पक्षकाराला काही न्यायालयीन काम असले की चंद्रपूरला जातांना त्याचा पूर्ण दिवस प्रवासात जातो सोबतच दिवसेंदिवस बसभाडे महाग झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत आहे .त्यामुळे ब्रम्हपुरी जिल्हा झाल्याने ब्रम्हपुरी मध्ये जिल्हा न्यायालय बनेल आणि सर्वसामान्य लोकांना वेळेत न्याय मिळेल” .
– ॲड आशिष एस.गोंडाने (ब्रम्हपुरी)


शिक्षनासंबंधी असलेली हीच परंपरा आरोग्याच्या क्षेत्रात लागू पडते. आजही ब्रम्हपुरीला लागून असलेले अनेक तालुके, लगतचे जिल्हे आरोग्यासाठी ब्रम्हपुरी शहरावर अवलंबून आहेत. स्वात्यंत्र्यपूर्व काळापासून दळणळणासाठी व व्यापारासाठी आवश्यक असलेली रेल्वेसेवा, बससेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे इंग्रज काळापासूनच चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर तालुका वगळता सगळ्या सोयी सुविधा असण्याच्या बाबतीत ब्रह्मपुरी हे जिल्ह्यातून अव्वल दर्जाचे शहर आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील इतर कोणत्याही तालुक्या पेक्षा ब्रह्मपुरी तालुका हा जिल्हा होण्यास पात्र तालुका आहे.

-सतिश डांगे (काँग्रेस शहराध्यक्ष एसी सेल ब्रम्हपुरी)

———————————————-
मधल्या काळात चिमुर जिल्हा निर्मितीसाठी मागणी करण्यात आली मात्र, चिमुर हे ठिकाण फार आतमध्ये असल्याने येथे विविध कामांसाठी जाण्याकरिता कमालीचा त्रास सहन करावा लागेल. या उलट ब्रम्हपुरी मुख्य मार्गावर असल्याने सर्वांसाठी सोयीचे होणार आहे.चिमुर च्या तुलनेत ब्रम्हपुरी शहर हे भौगोलिक दृष्ट्या, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात व आरोग्य क्षेत्रात, तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. ब्रम्हपुरी येथे नव्याने 100 खाटांचे ग्रामीण रुग्णालय ,नगर परिषद ची नवी इमारत, टोलेजंग प्रशासकीय इमारत, न्यायालयाची प्रशस्त इमारत आदी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हि सर्व विकासकामे जिल्हा निर्मिती हेच ध्येय ठेवून करण्यात येत असल्याचे दिसून येते .
– लक्ष्मीकांत फुलबांधे
अध्यक्ष
नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी

———————————————-
ब्रम्हपुरीच जिल्हा का?
चंद्रपूर जिल्ह्यातिल दूसरे मोठे शहर म्हणजे ब्रम्हपुरी जिथे शिक्षण,वैद्यकिय सोई मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
शिक्षणासाठी फार लांब आंतरावरुण विद्यार्थी आपल्या ब्रम्हपुरी शहरात येतात.शहरात गेल्या अनेक दशका पासून शिक्षण क्षेत्रात आघाडी वर आहे.

तसेच वैद्यकिय क्षेत्रात सुद्धा आपला शहर सर्वात समोर आहे.या खेरीज दळणवळनासाठी देखील आपले शहर अगदी मोक्याच्या जागे वर आहे. चिमुर या गावाला जरी ऐतीहासिक वारसा लाभला असेल म्हणून भावनिक होऊन जिल्हा निर्माण करणं हे मात्र जास्त होतंय.
-अजय खळशिंगे
मुख्य मार्गदर्शक
नाभिक युवा आघाडी ब्रम्हपुरी

———————————————-

ब्रम्हपुरी जिल्हा संघर्ष समिती,
ब्रम्हपुरी शहरात वास्तविक पाहता शाळा, महाविद्यायालये, दवाखाने, रोजगार आणि इतर सर्व सोयी सुविधा खूप चांगल्या नी आपल्याला मिळतात.
ब्रम्हपुरी मधील नागरिकांना आणखी सोयी मिळावा विकास व्हावा त्या करीता ब्रम्हपुरी जिल्हा झालाच पाहिजे असं आम्हा सर्व ब्रम्हपुरी वासियांची विनंती आहे.

शुभम भगतसिंह राठी
ब्रम्हपुरी जिल्हा संघर्ष समिती,

———————————————-
ब्रम्हपुरी जिल्हा व्हावा म्हणून गेल्या 5 ते 10 वर्षांपासून आपण पाहत आलेले आहोत आजपर्यंत काहीही हाती लागले नाही उलट परिणाम असा झाला की अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय चिमूर येथे स्थापन झाले हा ब्रम्हपुरी येथील सर्व राजकीय असो की सामाजिक पक्षांचा नाकर्तेपणाचा परिणाम आहे.अनेकवेळा आजी माजी आमदाराने केवळ पोकळ आश्वासने दिली व येथील भोळी जनता या भूलथापांना बळी पडून यांना निवडून दिले परंतु आता सर्वसामान्य ब्रह्मपुरीकर लोकांनी कोणत्याही पक्ष पार्टी सोडून केवळ ब्रम्हपुरी जिल्हा व्हावा यासाठी एक वज्रमुठ बांधलेली आहे व येणाऱ्या काळात आंदोलनांच्या माध्यमातून हा प्रश्न नक्कीच मार्गी लावणार अशी खूणगाठ बांधली आहे.
सुरज शेंडे सदस्य
ब्रम्हपुरी जिल्हा संघर्ष समिती ब्रम्हपुरी