अभिनेता प्रसाद सोनवणे च्या घरी बाप्पा विराजमान

✒️धुळे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

धुळे(दि.31ऑगस्ट):- आज सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम दिसून येतेय, मालिकांपासून ते नाटक- सिनेमांपर्यंत सर्वच कलाकारांच्या घरी लाडके बाप्पा मोठ्या थाटात विराजमान झाले आहेत.आपल्या बाप्पा सोबतचे सुंदर सुंदर फोटो आणि व्हिडीओ मराठी कलाकारांनी देखील त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवरुन शेयर केले आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे आज सर्वत्र मोठ्या जल्लोषात आगमन झाले आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात गणपती बाप्पाचे आगमन सामान्य सह मराठी कलाकारांच्या घरी देखील आगमन झाले आहे. मराठमोळा अभिनेता प्रसाद सोनवणे यांच्या घरी देखील श्री गणेशाचे आगमन झाले आहे.

यंदा बापांसाठी खास आकर्षण तयार करण्यात आलेले आहे. प्रसादच्या घरी यंदाचे 61 वे वर्ष आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी फिल्मी प्रवास हे डिजिटल प्लॅटफॉर्म प्रसादने प्रदर्शित केले. यावर्षी देखावा हिमालयातील पर्वत तयार करण्यात आलेले आहे. प्रसादने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत लिहिले बाप्पा विराजमान गणपती बाप्पा मोरया तसेच गणपतीला साकडं घालत आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED