कोणतंही संकट माझी वाट अडवू शकत नाही ; धनंजय मुंडेंचे आक्रमक भाषण

✒️बीड जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.1सप्टेंबर):-माझ्या मातीतील माणसांची आशीर्वादरूपी अपार शक्ती माझ्या पाठीशी आहे, कोणतंही संकट माझी ही वाट अडवू शकत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंडे यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देताना हे ट्विट केले. यामध्ये धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या आक्रमक शैलीत भाष्य केले आहे. संघर्ष आणि संकटांमधून आपल्या मातीतील माणसांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन वाट काढत जनसेवेच्या मार्गावर चालत राहीन, असे त्यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी बुधवारी बीड जिल्ह्यातील परळी येथे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना हजेरी लावली होती.

यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. आपल्या भाषणाचा शेवट धनंजय मुंडे यांनी शेरोशायरीने केला. “राह मे खतरे बहुत है, लेकीन ठहरता कौन है? मौत कल आती है, आज आ जाये, अरे डरता कौन है?

तेरे लष्कर के मुकाबले अकेला हूं मै मगर फैसला मैदान मे होगा की, मरता कौन है! असे धनंजय मुंडे यांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED