ओमकार दुधाळे व आदित्य ढोबळे या मुलांनी केली गणेशोत्सवाची अशी सुरुवात

✒️मनोहर गोरगल्ले(राजगुरुनगर प्रतिनिधी)

खेड(दि-१सप्टेंबर):-खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे महात्मा गांधी विद्यालयाच्या कोपऱ्यात गणपती उत्सवानिमित्त म्हातारी पान,फुले आणि नारळ विकायला बसलेली होती. एकही गिऱ्हाईक तिच्याजवळ नव्हते.कावरी बावरी होऊन ती म्हातारी इकडे तिकडे पाहत होती. कोनीतरी जवळ येईल आपल्याकडे पान फुले विकत घेईल अशी प्रचंड आशा ति बाळगुन होती असे चित्र तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसुन येत होते.

म्हातारीचा तो निरागस चेहरा चेहऱ्यावर वयामुळे पडलेल्या सुरकुत्या, चार दोन रुपये मिळवण्यासाठी जसे जमेल तसे रस्त्यावर तिने अस्ताव्यस्त पान फुलाचे दुकान थाटले होते.मी त्या आजी कडून काहीच विकत घेतले नसल्याने मनात रुखरुख होती.आपण तिच्याकडुन काहीतरी विकत घेतले पाहिजे. तिला तेव्हढेच समाधान मिळेल. रिक्षा घरीच ठेवली आणि टु व्हिलर घेतली त्या म्हातारीच्या दुकानाजवळ जात असतानाच दोंदे गावचे उपसरपंच सिध्दार्थ दादा कोहिनकर पाटील भेटले.

ते म्हणाले पाव्हण काय चाललय, मी म्हटलो काही नाही हो पान फुल घेतो ना गणपती बाप्पाला असे बोलुन त्या आज्जी जवळील उन्हात सुकुन गेलेला हार घेतला हाराची किंमत म्हातारीने ५० रुपये सांगितली होती म्हातारीला मि ७० रुपये दिले. म्हातारीला खुप आनंद झाला होतातिला किती समाधान मिळाले असेल हे मला माहित नाही परंतु तिच्या चेहऱ्यावरचे हसु मला नक्कीच समाधान देऊन गेले.

एवढ्यात सिध्दार्थ दादा बोलले पाव्हन हार लय सुकलेला घेतला हो,मी म्हटलो हार जरी सुकलेला असला तरी आज्जीचा चेहरा बघाना कसा टवटवीत फुललाय , अहो हार फक्त घ्यायचा म्हणुन घेतलाय तो हार आता निर्माल्यच झालाय जाऊ द्या …हे दृष्ये पाहुन सिध्दार्थदादाने माझी पाठ थोपटली आणि म्हणाले खरचच मानले पाहिजे बुवा तुम्हाला असे म्हणुन त्यांनी ५०० रुपयांचा किराणा या आज्जीला घेऊन द्या असे बोलुन ५०० ची नोट माझ्या हातावर टेकवली व माझा त्यांनी निरोप घेतला.

माझ्या मनी ध्यानी काही नसताना त्या आज्जीला एवढी मदत मिळाल्याचे मोठे समाधान मिळाले. किराणा घेत असताना साईराज मोटर्स वाहन बाजाराचे मालक माझे मित्र बाबाजीशेठ ढोबळे हे भेटले त्यांना मोठ्या आनंदात हा प्रसंग सांगताना त्यांना सुध्दा खुप भारी वाटले आणि त्यांनी लगेचच किराणा माल वाल्याला आणखी ५०० रुपयांचा किराणा वाढवायला सांगितला आता त्या आज्जीला १००० रुपयांचा मिळनार याचे समाधान आज खुपच मोठ्या प्रमाणात मिळाले.त्या आज्जीला ओंकार दुधाळे व आदित्य ढोबळे यांनी किराणा भेट दिला. 

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED