ज्येष्ठ निसर्गोपचारक डॉ. प्रल्हाद रत्नपारखी यांना श्रद्धांजली अर्पण

29

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.2सप्टेंबर):-रुरल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.प्रल्हाद रत्नापारखी यांचे औरंगाबाद येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. निसर्गोपचार सेवक म्हणून त्यांनी केलेले कार्य मोठे होते. निसर्गोपचार चिकित्साचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून ते दरवर्षी ते श्रीगुरुदेव आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडी ( जि. चंद्रपूर) येथे येत असत आणि या भागांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक निसर्गोपचार सेवकांना स्वयंस्फूर्त मार्गदर्शन करीत असे. सन १९९६ ते २००८ या कालावधीत विविध गावांमध्ये चंद्रपूर जिल्हा स्तरावरील निसर्गोपचार अधिवेशनात ते सहभागी झाले होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या जीवन कार्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती.‌ या महान विभूतीपासून ते प्रेरणा घेऊन अखंडपणे ग्रामगीतेचा प्रचार प्रसार औरंगाबाद भागात करीत असे.

दिवंगत डॉ प्रल्हादजी रत्नपारखी यांना अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ मुख्य शाखेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, पंडित पुडके, विलास निंबोरकर, उपेंद्र रोहणकर, संदीप कटकुरवार आदींनी डॉ. रत्नपारखी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. सामुदायिक प्रार्थना आणि जयघोष नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.