तैवानवरून चीनचा अमेरिकेला इशारा!

29

चीन आणि अमेरिका या दोन जगातील सर्वात मोठ्या महासत्ता आहेत. दोन्हीही देश महत्वाकांक्षी आहेत. दोघांनाही जगावर अधिराज्य गाजवायचे असून आपणच जगात सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवून देण्याची स्पर्धा या दोन देशात लागलेली असते त्यामुळे या दोन्ही देशांचे संबंध कायम ताणलेलेच असते. सध्या या दोन्ही देशांचे संबंध ताणलेलेच नाही तर तणावपूर्ण आहेत. या तणावाला कारणीभूत ठरली आहे ती अमेरिकन सिनेटच्या अध्यक्षा नॅन्सी पॉलिसी यांची तैवान भेट. नॅन्सी पॉलिसी यांनी मागील महिन्यात तैवानला भेट दिली. या भेटीला चीनने कडाडून विरोध केला होता कारण तैवान हा चीनचाच भूभाग असल्याचे चीन मानतो तर तैवान नागरिक मात्र चीनचे म्हणणे खोडून काढत तैवान हे स्वतंत्र राष्ट्र असल्याचे जगाला ओरडून सांगत आहे. तैवानचे स्वातंत्र्य अनेक राष्ट्रांनी मान्य केले असले तरी चीन तैवानला स्वतंत्र्य राष्ट्र मानत नाही त्यामुळे कोणत्याही देशांनी तैवानशी परस्पर व्यवहार करू नये. तैवानला कोणत्याही देशांनी परस्पर भेट देऊ नये अशी चीनची भूमिका आहे. अमेरिकेने मात्र चीनची ही भूमिका अमान्य करून तैवानला स्वतंत्र राष्ट्र असल्याचे घोषित केले त्यासाठीच नॅन्सी पॉलिसी यांनी तैवानला भेट दिली त्यामुळे चीन खवळला आणि चीनने तैवान सीमेवर मोठे शक्तिप्रदर्शन केले.

शक्तिप्रदर्शन करून चीन तैवानचे स्टेटस बदलण्याचा प्रयत्न केला जर तसे झाले तर त्याचा मोठा परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणावर होणार आहे. नॅन्सी पोलिसी यांचा तैवान दौरा संपून मोठा कालावधी उलटला असला तरी चीनची आगपाखड सुरूच आहे. चीनने नुकताच लाईव्ह फायर ड्रिलचा पहिला टप्पा पूर्ण केला असून या ड्रिलचा दुसरा टप्पा सुरु करण्याची घोषणाही चीनने केली आहे. या ड्रिलसाठी चीनने अत्याधुनिक लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, जहाजे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज उपकरणे तैनात करून आपला संताप जगजाहीर केला आहे. भविष्यात चीन तैवानबाबत आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. चीन तैवानवाबत आक्रमक होऊन अमेरिकेला इशारा देऊ इच्छितो की अमेरिकेने आता आमच्या नादी लागू नये. जर अमेरिकेने तैवानची बाजू घेऊन काही आगळीक केली तर चीन त्याला जशास तसे उत्तर देऊ शकतो. चिनही अमेरिकेप्रमाणे जगातील महाशक्ती आहे आणि या महाशक्तीच्या नादी जर अमेरिका लागली भविष्यात या दोन महासत्तामध्येही मोठे युद्ध होऊ शकते.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)