वरुड तालुक्यातील ३५ गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १०१ कोटी ६० लाख योजनेस प्रशासकीय मान्यता !

34

🔹आ. देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने मोर्शी विधानसभा क्षेत्रासाठी जिल्ह्यात सर्वाधिक निधी !

✒️वरुड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

वरुड(दि.2सप्टेंबर):-तालुक्यातील ३५ गावांच्या जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून बैठका घेऊन वरुड तालुक्यातील नागरिकांचा पिण्याच्या प्रश्न रेटून धरल्यामुळे वरुड तालुक्यातील ३५ गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी पंढरी प्रकल्पातून शून्य विजेवर चालणारी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी १०१ कोटी ६० लक्ष रुपये आमदार देवेंद्र भुयार यांनी मंजूर करून आणले असून त्यांच्या २ वर्षा पासूनच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे वरुड तालुक्यातील ३५ गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास आमदार देवेंद्र भुयार यांना यश आले आहे.

आमदार देवेंद्र भुयार यांनी २४ मे २०२१ रोजी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पंढरी मध्यम प्रकल्पातून वरुड तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पिण्याचे पाणी आरक्षित करून देण्याची मागणी केल्यामुळे वरुड तालुक्यातील ३५ गावांसाठी कायमस्वरूपी पाणी समस्या निकाली निघाली.वरुड तालुक्यातील ३५ गावांसाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी १९ जानेवारी २०२१ रोजी कार्यकारी अभियंता जल जीवन मिशन यांच्याकडे बैठक घेऊन वरुड तालुल्यातील भीषण पाणी समस्या निकाली काढण्यासाठी वरुड तालुक्यातील गावांना जल जीवन योजनेमध्ये समाविष्ट करून प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. ३ एप्रिल २०२१ रोजी माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे वरुड तालुक्यातील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्याची मागणी केली असता १४ जुलै २०२१ रोजी माजी राज्यमंत्री संजय बनसोडे व आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये वरुड तालुक्यातील ३५ गावांचा जल जीवन मिशनमध्ये समावेश करून तात्काळ प्राधान्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

१८ नोव्हेंबर २०२१ रोजी माजीमंत्री संजय बनसोडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जी प अमरावती, अभियान संचालक जल जीवन मिशन, जिल्हाधिकारी यांना वरुड तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. १२ जानेवारी २०२२ रोजी पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे वरुड तालुक्यातील ३५ गावांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रधान सचिवांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

वरुड तालुक्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पाणी पुरवठा स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे वरुड तालुक्यातील ३५ गावांसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याची मागणी केली असता माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिल्यामुळे सदर योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अमरावती यांनी २९ जून २०२२ रोजी तांत्रिक मान्यता प्रदान केली तसेच सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक छाननी उपसमितीच्या दिनांक १० जून रोजी झालेल्या बैठकीमध्ये तांत्रिक मंजुरी प्रदान करण्यात आली.
शासनाकडे विविध बैठक घेऊन यशस्वी पाठपुरावा करून जल जीवन मिशन योजने अंतर्गत मौजा पंढरी व ३५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मौजा पंढरी व ३५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देऊन प्रशासकीय प्रशासकीय मान्यता प्रदान करून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असता आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन १० ऑगष्ट रोजी शासन निर्णय काढून मौजा पंढरी व ३५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेण्यासाठी यशस्वी पाठपुरावा करून, तांत्रिकदृष्ट्या योजनेचा सखोल अभ्यास करून ३५ गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाला १०१ कोटी ६० लक्ष १० हजार ६२४ रुपयांचा प्रशासकीय मान्यता आदेश प्राप्त करून घेतल्यामुळे आता लवकरात लवकर या कामाला सुरुवात होणार असून वरुड तालुक्यातील ३५ गावांची तहान भागणार आहे.जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मोर्शी विधानसभा मतदारसंघातील वरुड तालुक्यात तीव्र पाणी टंचाई भासणाऱ्या तब्बल ३५ गावांसाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. जलजीवन मिशन योजनेतून ३५ गावांसाठी १०१ कोटी ६० लाख १० हजार ६२४ रुपयांच्या योजनेस प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाल्याने जिल्ह्यातील सर्वाधिक निधी मोर्शी विधानसभा क्षेत्रासाठी प्राप्त झाल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.

मागील अनेक वर्षांपासून मोर्शी विधानसभा मतदार संघातील सदर गावात दरवर्षी उन्हाळ्यात सतत तीव्र पाणी टंचाई भासत होती यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांनी या गंभीर विषयाची दखल घेऊन ३५ गावांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी सतत पाठपुरावा केल्याने वरुड तालुक्यातील राजुरा बाजार, अमडापुर, मांगरुळी, पेठ, कचूर्णा, करजगाव, सावंगा, अलोडा, टेंभणी, वाडेगाव, काटी, वघाळ, वंडली, गडेगाव, चिंचरगव्हान, मोरचुंद, पवनी, वडाळा, उदापुर, इसापूर, मेंढी, खानापूर, देउतवाडा, रोशनखेड, कुरळी, सुरळी, डवरगाव, वावरुळी, पिंपळखुटा, उराड, सावंगी, मुसळखेडा, वाठोडा, चांदस, बेलोरा या ३५ गावांचा पिण्याच्या प्रश्न निकाली निघणार असून या सर्व गावातील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.