


✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)
भद्रावती तालुका मोहबाळा येथील एका युवकाने गावाला लागून असलेल्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारला दुपारच्या दरम्यान उघडकीस आली. आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव सागर मधुकर खरे ( 41) वर्षे रा. मोहबाळा असे आहे.
सागर हा व्यसनाधीन असल्याने त्रस्त होता व यातूनच आज शुक्रवारला मोहबाळा गावातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली व यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असे सांगितले जाते.
या घटनेची माहिती भद्रावती पोलिसांना देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्याचे तलावातून प्रेत बाहेर काढले व घटनेचा पंचनामा करून मर्ग दाखल केला पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.




