युवासेना – सेक्युलर पॅनलच्या सर्व उमेवारांना विजय करा

🔹युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे व शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.3सप्टेंबर):-गोंडवाणा विद्यापीट गडचिरोलीच्या अधीसभेतील ( सिनेट ) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उभे असलेले युवासेना- सेक्युलर पॅनल च्या सर्व उमेवारांना आपले अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमताने विजय करावे असे आवाहन युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे व शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांनी गोंडवाना विद्यापीठा तमाम पदवीधर उमेदवारांना केले आहे,दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७ वाजता पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे, या निवणुकीत चंद्रपूर – गडचिरोली युवा सेना व सेक्युलर पॅनलच्या वतीने संयुक्तरित्या निवडणूक लढवली जात आहे.

युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे, युवा सेना सचिव वरून सरदेसाई, यांचे आदेशानुसार शिवसेना – युवासेना अधिकृत उमेदवार म्हणून युवा सेना जिल्हा प्रमुख प्रा, निलेश बेलखेडे, (खुला प्रवर्ग) व युवासेना सदस्य प्रा, प्रमोद कुचनकर (खुला प्रवर्ग) यांची नावे जाहीर झाली आहे, सेक्युलर परिवर्तन पॅनलचे प्रा, प्रणित भगत, प्रशांत डांगे, व राखीव प्रवग अड जगदिप खोब्रागडे, प्रा, राजेश केदार (एस टी) प्रा, संजय बोधे, (एन ती) प्रा अनिल डहाके (ओबीसी) डा, पूर्णिमा घोनमोडे (महिला राखीव) या उमेदवारांचा समावेश आहे,वरील सर्व उमेदवारांना एक नंबरची पसंती देऊन मतदान करावे असे आवाहन, युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे, चिमूर तालुका शिवसेना प्रमुख श्रीहरी सातपुते, यांनी सर्व मतदाराना केले आहे,

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED