भारतीय शिक्षकांचा सन्मान: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन!

31

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु,गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नम:

भारताचे प्रथम उपराष्ट्रपती व द्वितीय राष्ट्रपती आदरणीय डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा आपण पूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. ही भारतीय शिक्षक लोकांसाठी अतिशय गौरवाची तथा अभिमानाची बाब आहे. कारण विद्यार्थी जीवनात शिक्षक लोकांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. व शिक्षकाने विद्यार्थ्याला आदराचे स्थान मानुन त्यांना सद सद विवेक बुद्धीचा वापर करून विद्यार्थ्याला घडवले पाहिजे हीच खरी शिक्षकांची खरी संपत्ती आहे. व तीच भारतीय संस्कृती आहे. “केल्याने होत आहे रे! आधी केलेची पाहिजे”पिताश्री कितीही विद्वान असले तरी त्यांचा मुलगा हा शिक्षकाशिवाय घडत नाही. किंवा आपण आपल्या पाल्याला घडवू शकत नाही. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी शिक्षकाचीच आवश्यकता आहे. हे तुम्ही आम्ही सर्वांनी मान्य केलेच पाहिजे. व मान्य करायलाच पाहिजे.

एवढी शक्ती त्या शिक्षकामध्ये आहे. त्याप्रमाणे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस त्यांच्या परवानगीने आपण सारे भारतीय लोक शिक्षकदिन म्हणून साजरा करतो. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजीआंध्र प्रदेशातील तिरुतानी या गावी झाला. तेथून जवळच तिरुपती बालाजी हे देवस्थान आहे. या देवस्थानचा आणि घरच्या संस्कारमय वातावरणाचा त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला. त्यांच्या कुटुंबात तेलगू भाषा बोलली जात असे वडील एका श्रीमंत व्यक्तीकडे नोकरी करत होते. त्यामुळे घरात उत्पन्नाचे कोणतेही मोठे स्त्रोत नव्हते फक्त संस्कार चारित्र्य हीच कुटुंबाची खरी श्रीमंती होती. आणि तीच श्रीमंती डॉ.सर्वपल्ली यांना जीवनभर उपयोगी आली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्राथमिक शिक्षण तिरूतानी या गावी झाले. व पुढील शिक्षण बालाजी देवस्थानच्या गावी झाले. तेथील लुथरण विद्यालयात चार वर्षे त्यांनी अध्ययन केले. स्वभावाने अतिशय संकोच वृत्तीचे तथा एकांतप्रिय होते. त्यांना सर्वात जास्त वाचनाचा छंद होता. प्रत्येक गोष्टीवर गांभीर्यपूर्वक विचार करायचे त्यांच्या स्वतःच्या कार्यावर त्यांचा स्वतःचा दृढ विश्वास होता. त्यांचे व्यक्तिमत्व वाचन संस्कृतीतून घडले. असे म्हणावयास काय हरकत नाही. खरोखर त्यांचे “ग्रंथ हेच गुरु होते.”आणि ग्रंथांनीच त्यांची एवढी उंची वाढवली त्यामुळे ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण अगदी योग्य आहे.

या म्हणीचा आदर्श तुम्ही आम्ही सर्वांनी घेतला पाहिजे. पण आजचा काळ किंवा विद्यार्थी वाचन संस्कृतीकडे दुर्लक्षित होत आहे. त्यासाठी त्यांची वाचन संस्कृती जोपासण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.राधाकृष्ण यांनी एम. ए.ची पदवी प्राप्त केल्यावर ते चेन्नई मधील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती 1909 ते 1917 अशी आठ वर्षे सलग त्यांनी अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य केले. ते ज्यावेळेस प्राध्यापक झाले त्यावेळेस त्यांचे अवघे वय वीस वर्षाचे होते. राहणीमान अगदी त्यांचं साधं होतं. ते कधीही सुटाबुटात दिसले नाही. ते भारतीय पेहरावात वावरले पांढरे तलम धोतर अंगात शेरवानी सारखा बंद गळ्याचा कोट घालत डोक्यावर दक्षिणी भारतीय परंपरेचा फेटा घालत व चष्मा सोनेरी रंगाचा ते वापरत होते. अस त्यांचं सर्वसामान्य व्यक्तिमत्त्व होतं. त्यांनी भारतातच नव्हे तर प्रदेशात सुद्धा शिकवणीचे काम केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला एकदा उत्तर दिले.मी युरोपला शिकायला गेलो नाही; पण नक्कीच शिकवायला जरूर जाईन हा एक मोठा त्यांचा दृढ विश्वास सार्थ ठरला.

डॉ. राधाकृष्णन यांनी सन 1921 ते 31 अशी सलग दहा वर्षे कोलकाता विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे अध्यापन केले. व काही विषयाचे लिखाणही केले.

१) इंडियन फिलॉसॉफी
२) द हिंदू हू्य ऑफ लाईफ.
३) दि रिलिजन वुई नीड.
४) कल्कि दि फ्युचर ऑफ सिव्हिलायझेशन.

वरील सर्व ग्रंथ अभ्यासपूर्ण आहेत. विज्ञानामुळे माणूस सुखी झाला. पण त्याला मानसिक सुखाची आवश्यकता आहे. हे मानसिक सुख वाचन केल्याशिवाय अध्यात्माचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. विज्ञान केवळ भौतिक सुख देऊ शकेल पण आंतरिक सुखाचे काय त्यासाठी तुम्हाला आपला गॉडफादर ईश्वराचीच मनोमन आराधना करणे गरजेचे आहे.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी वेगवेगळ्या विद्यापीठात कॉलेजमध्ये अनेक पदावर कार्य केले. त्यांच्या पाठीशी अतिशय मोठा दांडगा अनुभव होता.त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात गेले. तर ते उज्वल क्रांती करून दाखवत होते. त्यामुळे सन 1952 पासून सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. त्यामध्ये तत्कालीन पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे पंतप्रधान तर भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची व उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांची निवड झाली.त्यांनी संलग दहा वर्ष उपराष्ट्रपतीपद भोगले व नंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या निवृत्तीनंतर स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची निवड झाली. व ते पाच वर्षे भारताचे राष्ट्रपती होते. यावेळेस त्यांनी पंधरा वर्षात अनेक राष्ट्रांच्या भेटीगाठी घेतल्या व भारताचे आणि परराष्टाचे अतिशय सलोख्याचे संबंध कायम ठेवले.ही एक भारतासाठी आनंदाची बाब आहे.

राष्ट्रपतीपदावरून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी चेन्नई येथे वास्तव्य स्वीकारले. त्यावेळेस त्यांचे वय 79 वर्षाचे होते. तरी पण त्यांचं वाचन लेखन चिंतन मनन या प्रत्येक बाबीवर अतिशय सूक्ष्मपणाने कार्यप्रणाली होती. डॉ. सर्वपल्ली यांची कार्यप्रणाली तथा त्यांचा जीवनपट अतिशय प्रेरणादायी होता. ते प्राध्यापक कुलगुरू व्याख्याते राष्ट्रसंघाचे सदस्य विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष युनेस्कोचे सदस्य रशियातील भारताचे राजदूत दहा वर्षे भारताचे उपराष्ट्रपती व पाच वर्षे राष्ट्रपती व अनेक विषयावर अभ्यासपूर्ण लेखन वाचन अतिशय सुंदर सुसंस्कार व व्यक्तिमत्त्व त्यांचं होतं. हे भारतीय लोकांना विसरून चालता येणार नाही.

अशा या दैदीप्यमान व्यक्तीला ईश्वराने 24 एप्रिल 1975 रोजी हिरावून घेतले. त्यावेळेस त्यांची वय 87 वर्षे होते.त्यांच्या कार्यकर्तुत्वाला मी शिक्षक या नात्याने सलाम करतो.

✒️शब्दांकन-दिगंबर चंपतराव माने(शिक्षक),भगवती देवी विद्यालय,देवसरी,उमरखेड जिल्हा यवतमाळ(मो:-9404412886)