‘आदर्शमाता प्रतिष्ठान’ चे कार्य महाराष्ट्रभर पोहोचेल.! : सोनहिराचे माजी व्हाईस चेअरमन प्रभाकर जाधव यांचा विश्वास

30

✒️सचिन सरतापे प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4सप्टेंबर):-दीन-दलित, पददलित आणि वंचितांना आवश्यक तो मदतीचा हात पुढे करून सामाजिक कार्य करत आहेच, त्याचबरोबर समाजातील गुणवंतांचा सत्कार करून मनाचा मोठेपणा दाखविणाऱ्या आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान कार्य महाराष्ट्रभर पोहोचेल असा विश्वास सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन प्रभाकर जाधव यांनी व्यक्त केले.

आसद तालुका कडेगाव येथे गणेशोत्सवानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला त्यावेळी तेथे सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी प्रभाकर जाधव,संतोष कुंभार,संपत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळींचा सत्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रभाकर जाधव म्हणाले, विविध संस्था किंवा संघटना काम करत असतात. परंतु काही वेळा संस्थेचे किंवा संघटनेची ध्येय आणि उद्दिष्ट मात्र बाजूला राहत असतात. आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठान मात्र ध्येय आणि उद्दिष्ट प्रमाने काम करून एक नवा ठसा उमटवत आहे.या सामाजिक बांधिलकी जपणार्‍या प्रतिष्ठानचा नावलौकिक आणि कार्याचा ठसा संपूर्ण महाराष्ट्र भरून ते असेही प्रभाकर जाधव म्हणाले. स्वागत व प्रास्ताविक आदर्शमाता प्रतिष्ठानचे कुळजीत महाजन यांनी केले तर आभार संजय जाधव यांनी मानले.