वंचित बहुजन आघाडी पूर्व व पश्चिम विभाग सातारा जिल्हा पदाधिकारी यांची अतिमहत्वाची एकत्रित बैठकीचे आयोजन

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.4सप्टेंबर):- वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हा प्रभारी प्रा.सोमनाथ साळुंखे सर यांचा संघटन बांधणी , तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद ,पंचायत समिती , नगरपरिषद निवडणूक संदर्भात सातारा जिल्हा दौरा होत असून वंचित बहुजन आघाडी पूर्व व पश्चिम सातारा जिल्ह्याच्या पदाधिकारी याची अतिमहत्त्वाची बैठक आयोजित केल्याचे जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने , सातारा जिल्हा प्रभारी प्रा.सोमनाथ साळुंखे सर यांचा जिल्ह्यातील संघटन बांधणी व आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, व पंचायत समिती. निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक पश्चिम विभाग सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, पूर्व विभाग सातारा जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे यांच्या उपस्थितीमध्ये रविवार दि.०४/०९/२०२२ रोजी शासकीय विश्रामगृह सदरबझार सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे.

तरी बैठकीसाठी सातारा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारणी , महिला आघाडी कार्यकारणी व युवक आघाडी कार्यकारणी उपस्थित रहावे.बैठकीस जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, शहर कार्यकारणी, महिला आघाडी कार्यकारणी व युवक आघाडी कार्यकारणी यांची उपस्थिती बंधनकारक आहे.याची सर्व पदाधिकारी सदस्य यांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष (सातारा पूर्व) यांनी केले आहे.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED