न्यायप्रविष्ठ व्यक्तिमत्व: स्व. नोमाजी माने पाटील

बोले तैसा चाले! त्याची वंदावी पाऊले!!

स्व. नोमाजी मारोती माने पाटील बोरी उमरखेड येथील ग्रामस्थ जन्म 1940 मध्ये झाला. लहानपणीच माता-पित्याचे छत्र हरवले. मावशी माणकेश्वर येथील तिने बालपण व शिक्षण केले. बाळदी मामाचे गाव प्राथमिक शिक्षण जि.प. ब्राह्मणगाव येथे झाले. आणि जन्मभूमी बोरी येथे वास्तव्यास येऊन आपल्या कर्मभूमीत सन 1960 साली सिताराम पाटील वानखेडे परिवार खरूस यांची कन्या कलावतीबाईसी विवाह केला. परिस्थिती जेमतेम सगळीकडे अठरा विश्व दारिद्र्य शेती होती. पण जुन्या काळात सुविधेचा अभाव त्यामुळे उत्पन्न फारसे नव्हते. त्यामुळे मोठ्या कास्तकाराकडे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे पाहता पाहता सहा अपत्यांना जन्म दिला
एवढ्या मोठ्या कुटुंबांना एकट्याच्या जीवावर कुटुंब चालवणे म्हणजे मोठी कसरत होती. पण साऱ्या संकटावर बजरंग बलीच्या कृपाशीर्वादाने त्या काळात मात केली. त्या काळात स्व. संभाजी नाना माने पाटील यांनी जशी जमेल तशी त्यांना मदत केली. त्यामधून कुटुंब सावरले मुलं मोठी झाल्यावर उत्पादनात अमुलाग्र बदल झाला.

मुळातच गरीबीमध्ये चटके सोसलेल व्यक्तिमत्व आणि प्रामाणिक वृत्ती सेवाभावी कार्य ग्रामीण भागात वाद, तंटा, भानगड यावर योग्य असा न्याय निवाडा करणार व्यक्तिमत्त्व म्हणून सर्व ग्रामस्थांचे विश्वासू होते. त्यामध्येच ग्रा.वि. का. सोसायटी बोरी येथील अध्यक्ष म्हणून त्यांनी 1980 ते 90व1995ते1998 पर्यंत त्यांनी यशस्वी धुरा सांभाळली आहे. व बोरी ग्रामपंचायतचे सरपंच श्री भाऊराव शावजी माने तर उपसरपंच नोमाजी पाटील हे 1990 ते 95 पर्यंत होते. अध्यक्ष व उपसरपंच असताना गाव विकासासाठी जमेल त्या पद्धतीने त्यांनी कार्य केले.त्यांच्या कार्यकाळात ग्रा. वि. का. सोसायटीची वसुली शंभर टक्के झाली होती. त्यावेळेस बँकेने अध्यक्ष नोमाजी पाटील यांचा व सदस्यांच्या सत्कार केला होता. हे विशेष म्हणावे लागेल.
आदरणीय श्रीमान प्रकाश पाटील देवसरकर यांचे ते विश्वासू कार्यकर्ते होते.

एक प्रसंग ते सोसायटीचे अध्यक्ष असताना सोसायटीचे थकीत कर्जदार शेतकऱ्यांना नोटीसा आल्या या कालावधीत कर्जाची परतफेड करा अन्यथा तुमची स्थावर मालमत्ता संपत्ती जप्त करण्यात येईल व त्याप्रमाणे बँकेचे अधिकारी बोरी गावात आले कर्जदार शेतकऱ्यांच्या घरावरील टिन (पत्र) काढण्याचा प्रयत्न करताच कर्जदार शेतकऱ्यांची यादी दाखवा त्यामध्ये काही श्रीमंत वर्ग सुद्धा होता त्यांनी अधिकाऱ्याला बजावले पहिले श्रीमंत कर्जदार शेतकऱ्यांच्या घरावरील टिन(पत्र) काढून घ्यावे व मग गरीब शेतकरी कर्जदाराच्या घरावरील टिन (पत्र) काढण्यास मी स्वतः मदत करेल. त्यावेळेस अधिकारी वर्ग माघारी परतले. असे ते गोरगरीब शेतकरी वर्गाचे खरेखुरे मायबाप होते. असे अनेक लोकपयोगी शाळकरी मुलं, लग्न प्रसंग, दुःख सुख, शेतकऱ्याच्या अडीअडचणी यांना त्यांनी वेळोवेळी सहकार्य केले.

या काळात त्यांचे सहकारी भाऊराव पा. बाजीराव पा. चंपतराव पा. आनंदराव पा. भंडारकर दत्तराव अध्यक्ष दत्तराव आबाजी दिगंबर मानकरी गणपत पा.देवराव पा. दत्तराव पो. पा. शेषराव पा. दत्तराव पा. (सरपंच) पांडुरंग पा. जळबाजी रोकडे लक्ष्मण रोकडे बापूराव गुरुजी श्री रामराव भुजंगराव माने हे होते.त्यांना अपत्य मारोती माने पंजाबराव माने संजय माने विजय माने ही मुलं व मुली सौ रतनबाई देवसरकर श्रीमती सुलाबाई कदम हे असून काही काळ पंजाबराव नोमाजी माने यांनी बोरी येथील सरपंच पदाची धुरा सांभाळली त्यांचे नातू शिवाजी मारोती माने हे अमुल दुग्ध डेअरी हरदडा येथे रुट निरीक्षक उमरखेड तालुक्यात त्यांची उत्तम कामगिरी आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्याप्रती ते उत्कृष्ट काम करतात.असं हे बोरी गावच ग्रामीण भागातील कुशल गोरगरिबांचा दाता प्रामाणिक न्यायप्रविष्ठ व्यक्तिमत्व 26 सप्टेंबर 1998 स्वर्गवासी झाले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम…!

✒️शब्दांकन:-दिगंबर चंपतराव माने(शिक्षक)भगवती देवी विद्यालय, देवसरी उमरखेड जिल्हा-यवतमाळ(9404412886)

महाराष्ट्र, यवतमाळ, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED