शरद जोशी यांची जयंती रक्तदानाने साजरी

55

🔸शरद जोशींनी लढण्याची हिंमत दिली – ॲड. वामनराव चटप

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.4सप्टेंबर):-शेतकरी संघटनेचे संस्थापक युगात्मा शरद जोशी यांची ८७ वी जयंती दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करुन साजरी केली. दिनांक ३ सप्टेंबरला झालेल्या या रक्तदान शिबीरात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, माजी आमदार ॲड. वामनराव चटप म्हणाले की, शरद जोशी यांनी ग्रामीण भागातील शेतकरी व जनतेला घामाच्या दामाचा मंत्र देऊन त्यांना स्वाभिमान शिकवला. शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीचे अर्थशास्त्र सोप्या भाषेत समजावून सांगत त्यांच्या स्वातंत्र्याचा लढा उभा केला. भारतीय शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शरद जोशींचे मोठे योगदान आहे. आता कितीही बिकट स्थिती व अन्याय झाला तरी त्यांचे विचारच शेतकऱ्यांना पुन्हा लढण्याची हिंमत देतात, असे मत ॲड. चटप यांनी व्यक्त केले.

युगात्मा शरद जोशी यांची आठवण सदैव कायम राहावी व त्यांना वंदन करण्यासाठी कार्यकर्ते दरवर्षी जयंती दिनी रक्तदान शिबिर आयोजित करतात. रक्तदान शिबिराचे हे एकविसावे वर्ष आहे. राजुरा ग्रामीण रुग्णालयापुढील राम मंदिर सभागृहात आयोजित या रक्तदान शिबिरात माजी आमदार ॲड. वामनराव चटप, ॲड. मुरलीधर देवाळकर, शेषराव बोंडे, रमेश नळे, प्रभाकर ढवस, हरिदास बोरकुटे, कपिल इद्दे, सुभाष रामगिरवार, ॲड.राजेंद्र जेनेकर, दिनकर डोहे, डॉ.भूपाळ पिंपळशेंडे, प्रशांत माणूसमारे, मारोती लोहे, भाऊजी कन्नाके, ॲड.सारिका जेनेकर, मधुकर चिंचोलकर, सुरेश आस्वले, राजकुमार डाखरे, शुभम रासेकर, स्वप्नील पहानपटे, हसन रिजवी, बबन रणदिवे, बळीराम खुजे, डॉ. गंगाधर बोढे, गजेंद्र झंवर, भाऊराव बोबडे, वसंता भोयर, बंडू देठे, रमेश रणदिवे, निखिल बोंडे, सुरज गव्हाणे, अजझर हुसेन, सूरज जीवतोडे, उत्पल गोरे, बंडू साळवे यांचेसह अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले.

या रक्तदान शिबिरासाठी राजुरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. लहू कुळमेथे,चंद्रपूर शासकीय रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलन करून सहकार्य केले.