लुधियाना (वृत्तसंस्था):-गेल्या काही महिन्यांपासून नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबच्या राजकारणात मौन बाळगले असले तरी त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी अजूनही शक्यता आहे. पंजाबच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे की, २०२२ मध्ये पंजाब विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी काँग्रेसला नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबरोबरचे सर्व वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात नवज्योतसिंग सिद्धू यांच्याबद्दल अनेक बातम्या येत आहेत.
नवज्योतसिंग सिद्धू यांना ऊर्जामंत्री पद देऊन पंजाब सरकारमध्ये परत आणण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, विशेष म्हणजे नवज्योतसिंग सिद्धू यांनी यापूर्वी ऊर्जामंत्री पदाला नकार दिला होता. तसेच, मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडून स्थानिक संस्था विभागाचा पदभार काढून घेतल्यामुळे त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. अशा परिस्थितीत नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा पंजाब सरकारमध्ये ऊजार्मंत्री होण्यास तयार होतील की नाही, याविषयी तर्कवितर्क बांधले जात आहेत.
गेल्या ब-याच दिवसांपासून सक्रीय राजकारणापासून दूर असलेले नवज्योतसिंग सिद्धू पुन्हा एकदा कॅप्टन सरकारमध्ये येण्याची शक्यता आहे. पंजाबच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल सुरू असल्याची चर्चा आहे. इंडियन ओव्हरसीज आयोजित ‘स्पीक अप इंडिया’ या कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धू यांचा सहभाग आणि त्यांनी केलेल्या भाषणानंतर ते पुन्हा एकदा मुख्य प्रवाहातील राजकारणात परतणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

खान्देश, मनोरंजन, मिला जुला , राजकारण, राजनीति, राष्ट्रीय, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED