हिंदुत्वाच्या नावाखाली दहशत मजवणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी जानेवारीत लॉंग मार्च : प्रा. जोगेंद्र कवाडे

28

🔹राज्यातून पंचवीस हजार लोक होणार सहभाग

✒️कोल्हापूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

कोल्हापूर(दि.4सप्टेंबर):- आज महाराष्ट्रासह देशभर जात आणि धर्माच्या नावावर मानवी समाजात दुही निर्माण करण्याचं नव राजकारण सुरु आहे. सत्तेसाठी खालची पातळी गाठली जात आहे. हिंदुत्वाच नव सोंग घेऊन भारतीय संविधानाला धक्का पोहचवण्याचं काम सुरु आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली सांस्कृतिक दहशत मजवण्याचं काम सरू आहे. या हिंदुत्वाच्या नावाखाली सांस्कृतिक दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जानेवारीत कोल्हापूरची शाहू नगरी ते मुंबईच्या चैत भूमी पर्यंत लॉंग मार्च काढणार असे प्रतिपादन प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. या लॉंग मार्च मध्ये राज्यातून पंचवीस हजार लोक होणार सहभागी होणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

ते प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, सन्मान फौंडेशन यांच्या वतीने आयोजित अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त केलेल्या सत्कार समारंभप्रसंगी बोलत होते. महाराष्ट्रातील कवी, लेखक, साहित्यिक, विचारवंत, कलावंत व संवेदनशील कार्यकर्ते यांच्याकडून ग्रंथतुला व 75 हजार संघर्ष निधी देऊन प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांचा जाहीर नागरी सत्कार राजर्षी शाहू स्मारक भवन, सभागृह, कोल्हापूर येथे लेखक व समीक्षक डॉ. गिरीश मोरे व ज्येष्ठ विचारवंत प्रा. टी. के. सरगर यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नंदकुमार गोंधळी हे होते. या वेळी मा. प्रा. जोगेंद्रजी कवाडे सर यांची प्रकट मुलाखत डॉ. गिरीश मोरे यांनी घेतली.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांना देण्यात आलेला 75 हजार संघर्ष निधी व त्यात स्वतः जवळचे 25 हजार व भूपाल शेट्टी यांनी दिलेले 25 हजार असा एक लाख पंचवीस हजार रुपयांचा संघर्ष निधी धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेला जाहीर रित्या देण्यात आला.
या भूपाल शेट्टी, प्रा. टी. के. सरगर यांची मनोगते झाली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक निमंत्रक कवी, लेखक व प्रकाशक अनिल म्हमाने यांनी केले तर मानपत्राचे वाचन ॲड. करुणा विमल यांनी केले. सूत्रसंचालन सनी गोंधळी तर आभार रतन कांबळे यांनी मानले. यावेळी विविध सामाजिक क्षेत्रात बांधिलकी मानून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सहनिमंत्रक डॉ. सोमनाथ कदम, डॉ. शोभा चाळके, डॉ. जयंत कार्तिक, सोमनाथ घोडेराव, विद्याधर कांबळे, अब्बास शेख, प्रा. रणजित भोसले, डॉ. कपिल राजहंस, सुरेखा भोसले, अनंत मांडूकलीकर, निवास सडोलीकर, डॉ. दयानंद ठाणेकर, शिवाजीराव परुळेकर, सुरेश सावर्डेकर, अरहंत मिणचेकर, रेखाताई कांबळे, अशोक भोसले, मोहन मिणचेकर, सागर कोलप, संतोष कांबळे, सिद्धार्थ घोडेराव, संभाजी वायदंडे, डॉ. संतोष कांबळे, प्रशांत आवळे, शांतीलाल कांबळे, जितेंद्र कांबळे यांच्यासह प्रागतिक लेखक संघ, निर्मिती विचारमंच, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट, सन्मान फौंडेशन आणि कोल्हापूर जिल्हा समविचारी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.