एनएमएमएस शिष्यवृत्ती परिक्षेत विनायक विद्यालयाची विद्यार्थीनी दिव्या कुमावत प्रथम

31

✒️लोणी खुर्द(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

लोणी खुर्द(दि.5सप्टेंबर):-वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणेच्यावतीने घेण्यात आलेल्या एनएमएमएस (NMMS) शिष्यवृत्ती परिक्षेत विनायक विद्यालय येथिल विद्यार्थीनी दिव्या प्रकाश कुमावत ह्या विद्यार्थीनीने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला.या परिक्षेत पहिला क्रमांक मिळवण्यासाठी तिने खुप परिश्रम घेतले, या परिक्षेसाठी गणेश शिनगारे (सर) व नंदू (सर) यांनी तिच्या अभ्यासाची तयारी करून घेतली.या परिक्षेत दिव्याचा प्रथम क्रमांक आल्याने तिचे सर्व स्थरावरून अभिनंदाचा वर्षाव होत आहे.

शुभेच्छुक :- खांदेश एक्टर अजय कुमावत, शिवभक्त अंकुश भाऊ कुमावत स्वराज्यक्रांती सेवा संघ संस्थापक, आदित्य पवार महाराष्ट्र उपाध्यक्ष, जागृती पाटील व्याख्याती छ.संभाजीनगर युवती जिल्हा अध्यक्ष, शुभम कुमावत नाशिक जिल्हा अध्यक्ष, डायमंड ग्रुप महाराष्ट्र राज्य, खांदेश कलाकार टिम, कुमावत परिवार, शिक्षक वृंद व लोणी खुर्द ग्रामस्थ