निष्ठावंत म्हणजे मुर्दाड!

कपिल सिब्बल यांनी काँग्रेस मुख्यालयात प्रेस कॉन्फ्रन्स घेतली. एकही चॅनेलने दाखविली नाही. कपील सिब्बल यांनी अशी क्लीप दाखवली कि, नोटबंदी होण्याच्या फार अगोदर, आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या सहीने, रुपये 2000 च्या नोटा प्रचंड प्रमाणात परदेशात छापल्या. त्या विमानाने, एअर फोर्स च्या विमानतळावर आणल्या गेल्या. त्या रिजर्व बँकेच्या माध्यमातून, जुन्या नोटांच्या बदल्यात, घाऊकपणे प्रायव्हेट डील करून, प्रायव्हेट पार्टीज ना बदलून देण्यात आल्या. त्यातून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला.या कामाकरिता RAW ची व आरबीआय ची माणसे गुप्तपणे कामाला लावली होती. एकूण तीन लाख कोटी रुपये बदलून देण्यात आले. RAW चा अधिकारी रवी रात्रेकर याचे मदतीने 20000 कोटी बदलण्यात आले. हे रिजर्व बँक बेलापूर शाखा यांच्या मदतीने बदलण्यात आले. संजय शाने मॅनेजर इंडसइंड बँक फोर्ट शाखा मुंबई याचे मदतीने, त्या बँकेच्या शाखेत 320 कोटी बदलण्यात आले. रबाळेनवी मुंबई येथील एमआयडीसी च्या गोडावून मध्ये 25000 कोटी रुपये बदलून देण्यात आले.

अशी माहिती कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत दिली असून, याबाबतच्या स्टिंग ऑपरेशनचे विडिओ व संभाषणाच्या ट्रान्स्क्रिप्ट सुद्धा पत्रकार परिषदेत दाखविले आहेत.अर्थात ही क्लिप बनावट आहे असा दावा केंद्र सरकार करेल. पण सुप्रीम कोर्टात आयुष्यभर वकिली करणारे घटनातज्ञ वकील कपिल सिब्बल यांनी ही पत्रकार परिषद घेतली आहे.स्वतः शहानिशा केल्याशिवाय ते बोलले नसल्याची शक्यता आहे.ते सुद्धा दहा वर्षे केंद्र सरकारमधे कैबिनेट मंत्री होते.म्हणजे जबाबदार व्यक्ती आहेत.त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.चौकसी करून सत्य माहिती जनतेसमोर सरकारने आणली पाहिजे.कोणताही संभ्रम किंवा गैरसमज जास्त काळ राहू देऊ नये.केंद्र सरकार जर स्वच्छ असेल तर केंद्राने याची चौकशी करावी. कपिल सिब्बल यांनी केलेले आरोप खोटे ठरले तर त्यांच्यावर देखील कारवाई करावी.तसे करण्यास केंद्र सरकार का धजत नाही?ही पत्रकार परिषद देशातील टीव्हीवर दिसत नाही.हा व्हिडिओ आणि नैरेशन कांग्रेस नेते कपील सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत केले.व्हिडीओ दाखवला.सोबत कमेंट्री केली.समजले,पटले.ही व्हिडिओ क्लीप दाखवणे योग्य. पण प्रत्येक शहरात जाऊन सिब्बल यांचे भाषण ठेवले तर लोक नक्कीच विचार करतील.

महाराष्ट्रात युती सरकार विरोधात गो.रा.खैरनार यांनी असाच राज्यभर प्रचार केला होता.नंतर पंधरा वर्षे युती सरकार आलीच नाही.केंद्रात राजीव गांधी यांच्या बोफोर्स घोटाळा विरोधात त्यांचेच अर्थ मंत्री व्हि पी सिंग यांनी सरळ फेअयरफैक्स एजंसीला चौकशी चे आदेश दिलेत.नंतर मंत्री पदाचा राजीनामा देऊन देशभर अभियान चालविले.राजीव गांधी चे सरकार निवडून आले नाही. व्हि पी सिंग प्रधानमंत्री झाले.आण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयक साठी तीन महिने दौरा करून आठ राज्यात सभा घेतल्या.तेंव्हाच लोक रामलीला मैदानावर जमले.इतके जमले कि कांग्रेस चे सरकार उलथवून टाकले.तसाच हा नोट बदली चा घोटाळा देशात सभा घेऊन लोकांना सांगितला पाहिजे.नक्कीच लोक विचार करतील.दुर्भाग्य हेच कि कांग्रेस चे नेत्यांनी जास्त खाऊन सुस्त झाले.त्यांना धड चालता येत नाही,ते कसे देशात फिरून सभा घेतील?

महाराष्ट्रात चव्हाण,थोरात, पटोले प्रदेश अध्यक्ष असतांना यांनी किती सभा घेतल्या? एकही नाही.सोनिया गांधी,राहूल गांधी,प्रियंका गांधी यांनी किती वेळा महाराष्ट्रात सभा घेतल्या? जळगाव जिल्ह्यातील एकतरी कांग्रेस नेत्यांनी जिल्ह्यात किंवा अन्य ठिकाणी किती सभा घेतल्या?एक ही नाही.कांग्रेस नेते इतके सुस्त आणि मस्त आहेत कि त्यांच्या कडे कोणते पद आहे,हेच जिल्ह्यातील लोकांना माहिती नाही.फक्त त्यांचे वाढदिवसाचे बैनर लागते तेंव्हा कळते,हा नवरदेव आहे काय ?शिवसेनेचे बेईमान आमदार सोडून गेले.पक्षात खूप मोठा खड्डा पडला.तो भरून काढण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.एका दिवसात चार पाच तालुके आणि सभा घेतल्या.असे कांग्रेस नेत्यांना जमते का?जर कांग्रेस नेते लोकांसमोर आलेच नाहीत तर लोकांनी त्यांच्या घरी जाऊन गर्दी करायची का?भाजप मधे बुद्धीमान व बोलभांड लोक जास्त आहेत.तुम्ही लबाड म्हणू शकता.

पण कांग्रेस मधे निर्बुद्ध व ढेपाळलेले लोक जास्त आहेत.त्यांना तुम्ही निष्ठावंत म्हणतात.चुकीचे आहे.त्यांना मुर्दाड म्हणू शकतात.जो जागचा हालत नाही,बोलत नाही,रडत नाही,हासत नाही त्याला निष्ठावंत म्हणून काय उपयोग?वाझोटी म्हशी ला तुम्ही ब्रम्हचारी म्हणून काय उपयोग?म्हणे आमची म्हैस व्हर्जीन आहे.तर बांधा तिचे एखादे मंदिर.करा पुजा.निष्क्रिय,निठल्ला माणूस त्रासदायक नसतो पण उपयोगी सुद्धा नसतो.तसा विचार केला तर प्रेते,थडगी जास्त निष्ठावंत असतात.ते जागचे हालत नाहीत.सडून जातील ,धसून जातील पण तक्रार करीत नाहीत.त्यांना निष्ठावंत विशेषण लागू होईल का?तसेच ज्यांना चालता येत नाही,बोलता येत नाही त्यांना निष्ठावंत म्हणणे चुकीचे आहेच.ते निष्ठावंत नाहीत. ते निरोपयोगी आहेत.निष्ठावंत म्हणजे मुर्दाड,असा अर्थ कांग्रेस च्या डिक्शनरीत असावा का?

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव.

 

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED