पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाने विद्यार्थिनीवर केला बलात्कार

    35

    ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागपूर(6 जुलै):-पाहुणा म्हणून आलेल्या तरुणानं सतत आठ दिवस विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची ही खळबळजनक घटना तहसील भागात उघडकीस आली. पीडित १७ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी अत्याचारी युवकाविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. शिवा शर्मा (वय २७, रा. जयपूर,राजस्थान) ,असे आरोपी युवकाचे नाव आहे.

    शिवा विवाहित असून, त्याला दोन मुले आहेत. तो पीडित मुलीचा नातेवाइक आहे. पीडित मुलगी बारावीत शिकत असून तिचे वडील खासगी कंपनीत काम करतात. आई गृहिणी असून, तिचा भाऊही शिक्षण घेत आहे. २१ जूनला शिवा पीडित मुलीच्या घरी आला. मध्यरात्री झोपेत असताना त्याने पीडित विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. दरम्यान मुलीला जाग आली असता शिवाने झोपेचं नाटक केले. २२ जून रोजी त्याने बळजबरीने विद्यार्थिनीवर अत्याचार केला. त्यानंतर सतत आठ दिवस त्याने पीडित विद्यार्थिनीवर अत्याचार केला.

    घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो जयपूरला गेला. यादरम्यान पीडित विद्यार्थिनी प्रचंड दहशतीखाली राहत होती. तिच्यासोबत घडलेल्या आत्याचाराविषयी तिच्या मैत्रिणींना सांगितले. मैत्रीणीवर ओढावलेल्या प्रसंगाबद्दल तिच्या मैत्रिणींनी तिच्या आई-वडिलांना कल्पना दिला. आई-वडिलांनीही पिडीत मुलीला धीर दिला असून तहसील पोलिसांत याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शिवाविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.