सडोली खा येथील ग्रामपंचायत ने केलेल्या मूर्तीदान आवाहनास चांगला प्रतिसाद

✒️डॉ सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.5सप्टेंबर):- जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यातील जनतेस मूर्तीदान व निर्माल्य संकलन आवाहन केले. याचे अनुकरण करत नदीचे पाणी दूषित होऊ नये म्हणून ग्रामपंचायत सडोली खा ने सदर उपक्रम राबवला. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणलेल्या मूर्तीची आरती प्रथम केली जात होती. त्यानंतर ग्रामपंचायत ने सजवलेल्या जलकुंभात त्याचे विधिवत विसर्जन करून तो कर्मचाऱ्यांकडे दान केले जात होते.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी मूर्तीदान साठी आलेल्या भक्तांचे स्वागत सरपंच श्री अमित पाटील व ग्रामसेवक श्री कोठावळे यांनी केले.

आरोग्याला प्राधान्य दिलेबद्दल सदर ग्रामपंचायत च्या या उपक्रमाचे कौतुक डॉ. संभाजी जाधव यांनी केले.यावेळी सदस्य जयसिंग कुंभार, राजेंद्र मगदूम,विशाल गायकवाड,बाळासो पाटील,पोलीस पाटील श्री पंकजकुमार पाटील, प्रा.निवास कुंभार, शिक्षक बँक संचालक एस व्ही पाटील, एकनाथ कुंभार ,कृष्णात कुंभार ,गोविंदा गायकवाड, सखाराम पाटील, शंकर चव्हाण, कल्लापा परीट उपस्थित होते.गौरी गणपती निर्माल्य साठी शैला कांबळे, ज्योती पाटील, सुवर्णा पाटील, शोभा कुंभार, सुनीता कुंभार, संगिता मगदूम यांनी विशेष प्रयत्न केले.आभार उपसरपंच सौ तेजस्विनी पाटील यांनी मानले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED