स्व.जमनादास गुप्ता यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त भजन संध्या कार्यक्रम पुण्यातील जमना अपार्टमेंट येथे संपन्न

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.6सप्टेंबर):- -स्व. जमनादास गीताराम गुप्ता (गर्ग) यांच्या 12 व्या स्मृतिदिनानिमित्त भजन संध्या कार्यक्रमाचे पुण्यातील औंध रोड येथील जमना अपार्टमेंट ,पहिला मजला येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जमनादास गुप्ता यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी एम जे असोसिएटचे संचालक मनीराम गुप्ता, इन्वेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक गोकुळ महाजन, तबलावादक सतीश काळे, गायिका स्वरांगी काळे, विमल गुप्ता, मीना अग्रवाल लीला अग्रवाल,श्रावी मीडिया अँड प्रॉडक्शनचे संचालक विवेककुमार तायडे,श्रावी मीडिया अँड प्रॉडक्शनचे व्यवस्थापक व गायक प्रशांत निकम, गीता राव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात तबलावादक सतीश काळे, गायिका स्वरांगी काळे , प्राजक्ता बिबवे,केतकी केळकर,प्रशांत निकम या गायक गायिकांनी भजन सादर केले.

आपल्या भाषणात मनीराम गुप्ता म्हणाले की “जमनादास गुप्ता यांच्या कार्याचा वसा पुढे चालू ठेवण्यासाठी व त्यांच्या सामाजिक कार्याचा वसा जपण्यासाठी आम्ही दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करत असतो”.जमनादास गुप्ता एक अध्यात्मिक व सेवाभावी व्यक्तिमत्व होते व त्यांनी अनेक गरजूंना मदत केली होती. एम जे असोसिएटचे संचालक मनीराम गुप्ता हे जमनादास गुप्ता यांचे सुपुत्र असून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. जमनादास गुप्ता यांच्या स्मृतीनिमित्त भजन संध्या कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो.

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED