स्वराज्य संघटना तलवाडा, गणपती बप्पाची आरती राहुल चाळक यांच्या हस्ते संपन्न

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

गेवराई(दि.6सप्टेंबर):-तालुक्यातील तलवाडा येथे स्वराज्य संघटनेच्या वतीने बसविण्यात आलेल्या गणपती बप्पाची आरती राहुल चाळक यांच्या हस्ते संपन्न करण्यात अाली. तलवाडा येथे छत्रपति संभाजी राजे रोड लगट आसलेल्या मारुती मंदिराच्या भव्य प्रांगणात स्वराज्य संघटना गणेश मंडळाच्या वतीने गणपती बप्पाची भव्य स्वरूपात मुर्ती बसविण्यात आली. या मंडळाचे अध्यक्ष रोषण विठ्ठलराव हात्ते व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी राबवत आसलेले पारंपारिक उपक्रम, विविध देखावे मनाला भावत असुन नुकतेच दोन दिवसापुर्वी गेवराईचे ऊप विभागीय अधिकारी डि.वाय.एस पी स्वप्निल राठोड व सपोनि प्रताप नवघरे यांनी भेट देऊन मंडळाचे अध्यक्ष रोषण विठ्ठलराव हात्ते व त्यांचे सर्व सहका-यांचे कौवतुक करुन शुभेच्छा दिलेल्या आहेत.

दिनांक 5/9/022 रोजी छावा क्रांतिवीर सेनेचे बीड जिल्हा अध्यक्ष राहुल चाळक यांच्या हस्ते स्वराज्य संघटना गणेश मंडळाच्या वतीने बसविण्यात आलेल्या गणपती बप्पाची आरती संपन्न झाली. या वेळी त्यांच्या सोबत मुकेश मोटे, नारायण चाळक,संजय काकडे, सुदाम मोरे, गेवराई तालुका समता परिषदचे अध्यक्ष पत्रकार बाप्पुराव गाडेकर, दैनिक लोकनायकचे तलवाडा प्रतिनिधी शेख आतिख भाई उपस्थित होते. स्वराज्य संघटना गणेश मंडळाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED