मातंग समाजावर अन्याया-अत्याचारा घटनेच्या विरोधात परभणीत सकल मातंग समाजाचा विराट महामोर्चा धडकला

27

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

परभणी(दि.6सप्टेंबर):- जिल्हाधिकारी कार्यालयावर 05 सप्टेंबररोजी सकल मातंग समाजाचा महामहामोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आसुन या महामोर्चात सिंगणापुर येथिल घटनेत स्वर्णलोकांनी गोंविद कांबळेयांना मारहाण करून गंभिर जखंमी केले होते.या मारहाणीच्या घटनेत गंभिर झालेल्या गोंविद यांचानांदेड येथिल शासकीय रूग्णालयात मृत्यु डाॅ.ने घोषीत केला होता.या घटनेत दोषीवर दैठणा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाले.या घटनेच्या निषेधर्थात आज 5 सप्टेंबर रोजी ज्ञानोपासक काॅलेज पासुन नवा मोंढा,नारायण चाळ मार्ग महात्मा फुले चौकांत महापुरूषाणा अभिवादन केले.

त्या नंतर महामोर्चा स्टेडियम मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथिल उपोषण मैदानात सकल महामोर्चाचे रूपातंर विविध नेत्याच्या भाषणाने संपन्न झाला आसुन.या महामोर्च्यात मयत गोंविद कांबळे यांच्या कुटुंबाना अर्थिक मदत व कुटुंबाच्या एक व्यक्तीला शासकिय नोकरी द्यावी. आशया विविध मागणी केली.

या महामोर्चात मानवहित लोकशाही संघटनाचे सचिन साठे,मानवी हक्क अभियानचे प्रमुख मिलिंद आव्हाड,लहुजी शक्ती सेनाचे विष्णुभाऊ कसबे,लालसेनाचे गणपत भिसे,लहुजी साळवे बहुजन सेनाचे राधाजी शेळके,मातंग संघाचे मराठवाडा अध्यक्ष मनोहर गवारे,बबन नेटके,पप्पु शेळके,अविनाश मोरे,एलडी.कदम,अनिल मोहिते आदी सकल महामोर्चायात बहुसंख्यात मातंग समाज सहभाग झाला होता.