क्षमतेपेक्षा जास्त ध्वनि प्रदूषण केल्यास मंडळावर गुन्हे दाखल होतील – उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.6सप्टेंबर):-गणेश उत्सव मोठ्या थाटात साजरे करण्यात येत असताना गणेश भक्तांनी गणेश विसर्जनच्या दिवशी डीजे सारख्या कर्कस आवाजाने ध्वनी प्रदूषण व नागरिक ना त्रास होईल असे प्रकारचे वाद्य वाजून प्रदूषण करू नये ध्वनी प्रदूषण केल्यास संबंधित वाद्य वाजवणारे व गणेश मंडळावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी आव्हान केले आहे व तसे गणेश भक्ताला नोटीसीद्वारे कळवले आहे .

सन उत्सव साजरे करण्यात येत असताना शासनाकडून धोनी वाजवण्यासाठी काही नियम अटी दिलेल्या असून त्या अटीच्या आधीन राहून गणेश भक्त व दोन्ही वाजवणारे यंत्रणेने शासनाच्या नियमाचे अधीन राहून दोन्ही प्रदूषण करावे नसता ध्वनीप्रदुषन ( विनियमन व नियंत्रण ) अधिनीयम 2000 कलम 8 प्रमाणे नोटीस ज्याअर्थी , व ध्वनीप्रदुषन ( विनियमन व नियंत्रण ) अधिनीयम -2000 कलम 8 प्रमाणे , अधिकारानुसार नमुद कायदयातील तरतुदी प्रमाणे ध्वनी प्रदुषन निर्माण करणारे साधनांचे विनियमन व नियंत्रण करणे आवश्यक आहे . त्यामुळे गणेशोत्सव व मिरवणुकीमध्ये वाद्य व लाऊडस्पिकर सिस्टीम इत्यादींचा वापर होणार असुन , मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदुषण होवुन ध्वनीप्रदुषणामुळे सर्व सामान्य नागरीकांना , वृध्दांना , रूग्णांना , बालकांना , मानसिक व शारिरीक त्रास होवुन सामाजिक स्वस्थ्यास हाणी होवुन शकते तसेच अतिउच्च ध्वनी कंपनामुळे अपघात होवु शकतो.

त्यामुळे मा . सर्वोच्च न्यायालय यांचे निर्देशानुसार , तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम सन 1986 सह ध्वनीप्रदुषण विनियमन व नियंत्रण नियमावली 2000 चे अन्वये ध्वनीक्षेपक / लाऊडस्पिकर , संगीत वाद्य व इतर वाद्यांचा वापर शासनाने विशेष वेळी एका कॅलेंडर वर्षात 15 दिवस रात्री 22.00 वा . ते 24.00 वा . पावेतो दिलेली सवलत खेरीज करून इतर दिवशी दररोज सकाळी 06.00 वा . ते 22.00 वा . पावेतो करता येईल . तसेच या कायद्यान्वये ध्वनीक्षेपक / लाऊडस्पिकर , वाद्यांचा वापर हा शांतता क्षेत्र वगळून इतर ठिकाणी खालील नमुद क्षेत्रानुसार खालील डेसीबल मर्यादेपेक्षा जास्त ठेवण्यात येवु नये , क्षेत्र कोड क्षेत्र अ ब क ल औद्योगिक क्षेत्र व्यापारी क्षेत्र निवासी क्षेत्र शांतता क्षेत्र दिवसा ( 06.00 ते 22.00 वा . ) 75 डी.बी. ( अ ) एलईक्यु 65 डी.बी. ( अ ) एलईक्यु 55 डी.बी. ( अ ) एलईक्यु 50 डी.बी. ( अ ) एलईक्यु रात्री ( 22.00 ते 24.00 वा . ) 70 डी.बी. ( अ ) एलईक्यु 55 डी.बी. ( अ ) एलईक्यु 45 डी.बी. ( अ ) एलईक्यु 40 डी.बी. ( अ ) एलईक्यु प्रमाणे आवाजाचा वापर करावा.

उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड यांनी आव्हान केले आहे व नोटीसीद्वारे गणेश भक्त मंडळ डीजे वादक यंत्रणा यांनी सणा दिवशी वापरण्यात आलेले ध्वनीक्षेपक / लाऊडस्पिकर , संगीत वाद्य इत्यादीचा पर्यावरण ( संरक्षण ) कायदा सन 1986 सह ध्वनीप्रदुषन ( विनियमन व नियंत्रण ) अधिनीयम -2000 चे अन्वये ठरवुन दिलेल्या डेसिबल क्षमतेपेक्षा जास्त वापर किंवा त्याच्या ठराविक मर्यादेची आवाजाची पातळी ओलांडु नये . अन्यथा सदर आदेशाचे भंग केल्याबाबत पर्यावरण ( संरक्षण ) कायदा सन 1986 सह ध्वनीप्रदुषन ( विनियमन व नियंत्रण ) नियमावली 2000 चे कलम 15 अन्वये आपल्या विरूध्द गुन्हा दाखल होवुन आपण वापरलेले वाद्य व लाऊडस्पिकर सामुग्री जप्त करण्यात येईल. असे पोलीस विभागातून कळवण्यात आलेले असून गणेश भक्त व संगीत वाद्य यंत्रणा यांनी माननीय न्यायालयाचे आदीन राऊत कसल्याही प्रकारच्या नागरिक न त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशी आव्हान उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड यांनी केले

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED