राञप्रशाला म्हणजे विद्यार्थी वर्गाचे अनुभवाचे विद्यापीठ आहे

28

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.6सप्टेंबर):-चिंतामणी राञ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय,चिंचवड स्टेशन,पुणे १९ मध्ये विद्यार्थी वर्गाने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.विद्यार्थी वर्गाने आपल्या शिक्षकांना श्रीफळ,गुलाबपुष्प,पेन भेट देऊन आपल्या गुरुजनांबद्दल आदर व्यक्त केला.

यावेळी विद्यार्थी वर्गाने शिक्षक दिनाबद्दलचे महत्व सांगितले.काही विद्यार्थी वर्गाने गुरु परंपरेची महती दिली.आपल्या शिक्षकांबद्दल आदराच्या भावना व्यक्त करुन आपल्या गुरुजणांचा प्रेम व्यक्त केले.यावेळी चिंतामणी प्राचार्य दिलीप लंके म्हणाले,”चिंतामणी ही राञशाळा म्हणजे विद्यार्थी घडविणारे व वेगळ्या अनुभवाचे विद्यापीठ आहे.दिवसा काम करणारे हे विद्यार्थी आपले अर्धवट राहीलेले शिक्षण पूर्ण करत असतात. आपल्या विद्यार्थीच्या जीवनातील संघर्ष हा अनुभवांचा परीपाक आहे.आपल्या मनातील जिद्द कमी होऊ देऊ नका.आजचा शिक्षक दिन हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस असतो.”

यावेळी विद्यालयाच्यावतीने सर्व प्राध्यापक व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.प्राध्यापक व शिक्षकांनी आपल्या यावेळी भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले,”शिक्षकाचा सन्मान ज्या ठिकाणी होतो.तोच देश महान ठरतो.शिक्षक हा छापील पुस्तकातील आतील अंतरंग आपल्या विद्यार्थांना उनगडून दाखवत असतो.जीवनाचे अनुभव व ज्ञान तो आपल्या अध्यापनातुन विद्यार्थी वर्गासमोर मुक्त उधळण करत असतो.विद्यार्थी प्रिय शिक्षक हा नेहमी विद्यार्थांना प्रेरणादायक असतो.शिक्षक हा समाजाचा कणा आहे.”

यावेळी विद्यालयातील इ.८ वी ते १२ वी तील सर्व विद्यार्थी,विद्यार्थींनी उपस्थित होते.तसेच प्रा.राजेंद्र सोनवणे,प्रा.प्रिया भामरे,प्रा.रुकसाना शेख,मारुती वाघमारे,रामधन कसबे,केशव कळसकर,सौ.प्रणिता पोटे,नारायण चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूञसंचालन प्रा.प्रिया भामरे यांनी केले.आभार प्रदर्शन मारुती वाघमारे यांनी मानले.