लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी कलावंतांची उपासमार थांबविणे गरजेचे- प्रा.डॉ. सुरेश खोब्रागडे

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

भंडारा(दि.7सप्टेंबर):-लोककलावंत आयुष्यभर मनोरंजनासोबतच समाजाला बौद्धिक खाद्य पुरवून समाजप्रबोधन करतात. मात्र आयुष्याच्या शेवटी शासनाच्या उदासीन धोरणामुळे तुटपुंज्या मानधनावर त्यांना पोटाची खळगी भरावी लागते. त्यात कलावंतांना मानधनापासून कायम मुकावे लागते. महाराष्ट्रात लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करणाऱ्या लोककलावंताची फरफट थांबावी यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. वाढत्या महागाईनुसार आणि कलावंतांच्या श्रेणीनुसार त्यांना मानधन द्यावे अपंग कलावंतांना विशेष मानधनाची तरतुद करावी .

लोककलेच्या मेळाव्यांना अनुदान द्यावे, निराधार कलावंतांना जागेसह निवाऱ्याची व्यवस्था विशेष बाब म्हणून करण्यात यावी यासाठी जिल्हास्तरावर कार्यालय व्हावे तरच लोककलेला जिवंत ठेवता येईल असे विचार लाखनी येथील गुरुवंदन विदर्भस्तरीय लोककला महोत्सवाच्या अध्यक्षीय भाषणातून लेखक, साहित्यिक, कवी, कलावंत प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रीय कमर कलानिकेतन सोमलवाडा द्वारा आयोजित नुकतेच दोन दिवसीय गुरुवंदन विदर्भस्तरीय लोककला महोत्सव लाखनी येथे संपन्न झाला. जैन कलार सभागृह सावरी /लाखनी येथे झालेल्या महोत्सवाचे उद्घाटन सुरेश डोंगरे यांनी केले डॉ. सुरेश खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महोत्सवात अतिथी म्हणून संजीवनी नान्हे, भागवत नान्हे, डॉक्टर मनीषा निंबार्ते, डॉ. देवानंद नंदागवळी त्रिवेणी पोहरकर नगराध्यक्ष, मंदा गभने, प्रबोधनकार तुषार सूर्यवंशी,शाहीर पुरुषोतम खांडेकर, शाहिरा वैशाली रहांगडाले,दिनेश पंचबुद्धे, उम देव कहालकर, केशव फसाटे, आशा रामटेके, आशा मेंढे, महेंद्र सातपुते, हिराबाई, पंकज गायकवाड, लोकशाहीर श्रीराम मेश्राम, माणिकराव देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी महेंद्र गोंडाणे, विक्रम पांढरे, शाहीर आर्यन नागदेवे , प्रबोधनकार मनोज कोटांगले, सुरमा बारसागडे, सुभाष कोठारे, शाहीर अंबादास नागदेवे, नागोराव वाढई,संजय सायरे, आधी कलावंतांनी आपल्या कलाकृती सादर केल्या आयोजक शाहीर अंबादास नागदेवे, श्रीकांत नागदेवे, संजय वनवे, आर्यन नागदेवे, आकाश भैसारे , ओ. रा शेंडे, पालीकचंद बिसने, विनोद लांडगे, संतोष फसाटे, नाशिक चवरे सचिव, आदी कलावंतांनी अथक परिश्रमातून लोककला महोत्सवाचे आयोजन केले. दोन दिवस विविध कला सादर करणाऱ्या कलावंतांना व पाहुण्यांना स्मृतिचिन्ह,प्रमाणपत्र, शाल, पुष्पगुच्छ देऊन आयोजकांनी सन्मानित केले.

आयोजकांनी कार्यक्रमाचे विलक्षण बहारदार सूत्रसंचालन कलावंत प्राध्यापक शीलवंत कुमार मडामे आणि नाशिक चवरे यांनी केले प्रास्ताविक कलावंत ओ. रा.शेंडे यांनी तर आभार संजय वनवे यांनी मानले स्वागत गीत, आगमन गीत आणि प्रेरणा गीत आकाश भैसारे याच्या यांच्या संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनींने गाऊन कार्यक्रमात बहार आणली. या कला महोत्सवात विदर्भातील बहुसंख्य कलावंतांनी हजेरी लावली होती कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाहीर अंबादास नागदेवे, नाशिक चवरे, आर्यन नागदेवे,श्रीकांत नागदेवे , आकाश भैसारे प्रा. संजय वनवे, संतोष फसाटे,प्रमोद लांडगे, आदींनी मोलाचे सहकार्य केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED