श्री संजय गायकवाड जि. प.आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

✒️पी.डी पाटील(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगाव(दि.7सप्टेंबर):-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द ता.धरणगाव जि. जळगाव येथील उपक्रमशिल,विद्यार्थी प्रिय, सहकार्यशील असे उपशिक्षक श्री संजय पोपट गायकवाड यांना नुकताच जळगांव जिल्हा परिषदेने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री.डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,बुके,सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन श्री.संजय गायकवाड यांचा गौरव करण्यात आला.श्री.संजय गायकवाड यांनी प्रवेश जाहिरात छापून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील १५ मुलं आपल्या मराठी शाळेत दाखल केली.

कोरोना काळात श्री संजय गायकवाड यांनी रेशन दुकानावर कर्तव्य बजाविले, रक्तदान करणे कोरोना विषयी जनजागृती करणे यासारख्या सामाजिक उपक्रमां बरोबरच शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम राबविला. संजय गायकवाड यांनी तंबाखूमुक्त शाळा तालुका समन्वयक या नात्याने स्वतःची शाळा तर तंबाखूमुक्त केलीच पण तालुक्यातील ८२% शाळा तंबाखूमुक्त केल्या.बालरक्षक म्हणून त्यांनी मागील दोन वर्षात ८ शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत दाखल करून त्यांना शालेय प्रवाहात आणले.श्री गायकवाड यांनी 35 हजार रुपये लोकसहभाग मिळून बाला उपक्रम अंतर्गत शाळा बोलकी केली.

धरणगाव, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED