भारत देशाच्या स्वातंत्र्याचे पहले जनक क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती निमित्त प्रतिमा पूजन माल्यार्पण

60

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.7सप्टेंबर):- धरणगाव येथील कै.भवरलालभाऊ जैन सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालया तर्फे भारत देशाच्या स्वातंत्र्याचे पहले जनक क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रतिमापूजन व माल्यार्पण ज्येष्ठ नागरिक परेश नाईक व योगेश पी.पाटील पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राजेंद्र फुलपगार, नंदू पाटील नगरसेवक,राहुल पाटील,रघुनंदन वाघ,योगेश पाटील,गोपाल पोकळणे,दिपक गायकवाड़ आदी उपस्थित होते.