दत्तनगर मधील नवयुवक बाल गणेशोत्सव मंडळ ठरतेय आदर्श गणेशोत्सव मंडळ

✒️नानासाहेब ननवरे(कूरुल प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.7सप्टेंबर):- परिसरात यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पौराणिक, धार्मिक देखाव्यांसह भव्य देखावे साकारण्यात आले आहेत. गेली दोन वर्ष गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरे झाले होते. यांदा मात्र गणेश भक्तांच्या उसाला उधाण आले आहे चंद्रपूर परिसरात यंदा भव्य देखावे साकारण्यात आले आहेत.मात्र दत्तनगर मधील नवयुवक बाल गणेश मंडळांने स्वच्छता, आरोग्य, स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव व पर्यावरण जागृती आदी विषयांवर जनजागृती पर देखावे साकारण्यात आले आहेत.विशेष म्हणजे नवयुग बालगणेश उत्सव मंडळाने सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक मिळवला आहे.

गणेशोत्सव जवळ आला की गणेशोत्सव कसा साजरा करावा?डॉल्बी, गुलाल पाहिजे का नको? अशा अनेक गोष्टींवर चर्चा होते.अनेकदा सगळीकडे गणेशोत्सव मंडळांमध्ये सुरु असणाऱ्या हिडीस प्रकाराचीच चर्चा होते, मात्र प्रत्येक वर्षी नवयुवक बाल गणेशोत्सव मंडळ खुप चांगलं काम करुन समाजाला आदर्श देत असतात.दत्तनगर परिसरातील श्री हनुमान मंदिराच्या बाजूला दरवर्षी नवयुवक बाल गणेश उत्सव मंडळ गणपतीची स्थापना करीत असते. यावर्षी मंडळाच्या वतीने महाराष्ट्रात पहिल्यांदाच आगळी-वेगळी संकल्पना घेऊन स्वच्छेतेचा संदेश देणारी श्रींची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. स्वच्छतेचे काम करणारे किती महत्त्वाचे आहे, हे या मूर्तीच्या स्थापनेतून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

पाण्याचे महत्त्व ओळखून प्रत्यक्ष रेनवाॅटर हार्वेस्टिंगचा नैसर्गिक पाऊस पडणारा देखावा तयार केला आहे. हे वर्ष देशाचे स्वतंत्र अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. याचा सुद्धा देखावा मंडळांने साकारला आहे या वर्षी मंडळाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वार्ड स्वच्छता अभियान, अनाथांना सहकार्य उपक्रम राबविले आहेत. आणि इथून पुढेही मंडळाच्या वतीने अशेच सामाजिक उपक्रम राबविली जाणार आहेत अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी दिली.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED