पुसद येथील प्रज्ञापर्व समिती व समाज बांधवाच्या साखळी उपोषणास भारतीय बौध्द महासभेचा जाहीर पाठिंबा

33

✒️बाळासाहेब ढोले(पुसद,तालुका प्रतिनिधी)

पुसद(दि.8सप्टेंबर):-धम्मनायक सम्राट अशोक महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे व सभोवतालच्या अतिक्रमण हटवून सौंदर्यीकरण करण्यासाठी साखळी उपोषण दि. ५ सप्टेंबर २०२२ पासून सुरू करण्यात आले आहे .

सदर उपोषण सुरू करत असल्याचे निवेदन नगर परिषद मुख्य
अधिकारी, उपविभागीय अधिकारी पुसद, तसेच यवतमाळ जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्हा, व आमदार इंद्रनील नाईक यांनाही निवेदनाच्या प्रती देण्यात आले आहेत.

प्रज्ञापर्व समिती २०२२ च्या वतीने पुसद शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण व सुशोभीकरण संदर्भात नगर परिषद पुसद मुख्याधिकारी, तत्कालीन नगराध्यक्ष, यांच्याशी अनेक वेळा प्रज्ञापर्व शिष्टमंडळाने बैठका, निवेदन, चर्चा घेण्यात आल्या परंतु नगर परिषदेच्या कार्यालयातून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.म्हणून प्रज्ञापर्व समिती व समाज बांधव यांच्या वतीने नाईलाजास्तव पुतळा सौंदर्यीकरण व सुशोभीकरण संदर्भात लोकशाही मार्गाने उपोषणाचा अवलंब करावा लागत आहे.प्रशासनाने कुंभकर्णाची भूमिका घेतल्यास हे उपोषण अधिक तीव्र करून साखळी उपोषण धरणे आंदोलन याही मार्गाचा अवलंब केल्या जाईल अशी महिती समितीच्या वतीने देण्यात आली.

दिनांक ५ सप्टेंबर २०२२ पासून सुरू झालेल्या या साखळी उपोषणास वंचित बहुजन आघाडी पुसद तालुक्याच्या वतीने व भीम आर्मी भारत एकता मिशन यवतमाळ जिल्ह्याच्या दि.६/९/ २०२२ रोजी पारामिता महिला महाविरनगर पुसद व आज दि.७/९/२०२२ रोजी भारतीय बौध्द महासभा पुसद शहर शाखा व तालुका यांच्या वतीने जाहीर लेखी पाठिंबा देण्यात आला आहे.

यावेळी प्रज्ञापर्व समिती अध्यक्ष विठ्ठल खडसे सर, आंबेडकरी ज्येष्ठ नेते भीमराव कांबळे , प्रज्ञापर्व समितीचे कार्याध्यक्ष अशोक भालेराव उपाध्यक्ष राजेश ढोले, राजेंद्र नाईक, प्रज्ञापर्व समितीचे माजी अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, दीपक भवरे,भारतीय बौध्द महासभा तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे, शहराध्यक्ष ल.पु.कांबळे, माजी सैनिक डि.जी.कांबळे, एस.एम.भगत, कृष्णा दांडेकर, राहुल पडघणे, विजय कांबळे, रमेश सावळे,संघरतन कांबळे, अरविंद थोरात, राजु चवरे,नरेंद्र पाटील, प्रसाद खंदारे , पत्रकार कैलास श्रावणे, इत्यादी प्रज्ञापर्व समिती व भारतीय बौध्द महासभेचे पदाधिकारी व इत्यादी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.