संजय सर यांना जि.प.चा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.8सप्टेंबर):-शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेतर्फे 15 प्राथमिक तर एक माध्यमिक अशा एकूण 16 शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराचे वाटप करण्यात आले. चिमूर पंचायत समितीमधून जि प उच्च प्राथमिक शाळा, सोनेगाव वन शाळेमधील उपक्रमशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक संजय सर यांना जि प चा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर तर प्रमख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, कपिलनाथ कलोडे (पंचायत), राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त ना.गो. थूटे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, डायटचे प्राचार्य चाफले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मातकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. हिरुडकर, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता रायपुरे, उपमुख्य लेखा अधिकारी पेंदाम, विश्वजीत शहा, विलास वनकर, अमोर रोडे आदी उपस्थित होते.

संजय सर यांना जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन कुटुंबासह सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलनाने आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी जि.प. ज्युबली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन एकता पितुरकर यांनी केले.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED