बीड जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव; शेतकरी-दुग्धव्यावसायिक चिंतेत

🔹बाधित जनावरांसह पाच किलोमीटर अंतरावर लसिकरण सुरू

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.8सप्टेंबर):-शेजारील अहमदनगर जिल्ह्यात अनेक जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्यानंतर आता बीड जिल्ह्यात देखील याचा शिरकाव झाला आहे. आष्टी तालुक्यातील पशुधन विकास कार्यालयाने संशयित जनावरांचे पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविलेले नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तीन गावांपैकी दोन गावांतील जनावरांचे नमुने बाधित आले आहेत.

आष्टी तालुक्यात लंपी स्कीन संसर्गजन्य आजारांची लागण होऊ नये म्हणून पशुधन विभागाने शीघ्र कृती दल स्थापन केले होते. लसीकरण मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, देवळाली, इमनगांव व फत्तेवडगाव या तीन गावातील जनावरांना लागण झाल्याचा संशय होता. येथील जनावरांचे नमुने ६ सप्टेंबर रोजी तपासणीसाठी पशुधन विभागाने पुणे येथे पाठवले होते. यातील देवळाली व इमनगांव येथील नमुने गुरूवारी पाॅझिटिव्ह आले असून एका गावातील अहवाल येणे बाकी आहे. लंपी संसर्गजन्य आजाराने शिरकाव केल्याने पशुधन विभाग सक्रिय झाला आहे.

बाधित जनावरांसह पाच किलोमीटर अंतरावर लसिकरण सुरू
______________________________

दोनही ठिकाणी गायीला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले असून आता पशुधन विकास कार्यालय अंतर्गत त्या गावातील पाच किलोमीटर अंतरावर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. जनावरे बाधित असली तरी ती ठणठणीत असल्याचे तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ.मंगेश ढेरे यांनी सांगितले.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED