रयत शिक्षण संस्थेच्या दावडी विद्यालयामध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी

30

✒️मनोहर गोरगल्ले(खेड,तालुका प्रतिनिधी)

राजगुरुनगर(दि.8सप्टेंबर):–रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय दावडी मध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे आग्रणी,ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अंकुश केंगारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालाचे पर्यवेक्षक महादेव आगम उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर विद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ वंदना गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

त्यानंतर विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्री श्रीकांत घुले यांनी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा जीवन परिचय आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांपुढे व्यक्त केला .त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी समीक्षा गव्हाणे हिने आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून माहिती दिली .सर्वात शेवटी आपले अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य अंकुश केंगारे यांनी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली व त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन देशासाठी कार्य करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख सौ वंदना गावडे यांनी केले तर आभार उपशिक्षक विलास बरबटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते