पाच महिन्यापासून पद्मावती गावातील एकही रेशन कार्ड धारकांना धान्य नाही-सुदाम राठोड यांचा आरोप

79

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.8सप्टेंबर):-तालुक्यातील पद्मावती या गावात सर्वच नागरिकांकडे राशन कार्ड आहे पाच महिन्यापासून एकही कार्ड धारकांना राशन मिळत नाही आहे असा आरोप गावकर्यांनी केला आहे सदर गावात राशन दुकानदार बळवंत गोतावळे हे असून राशन वाटप सिद्धेश्वर जाधव हे करतात.

मागील पाच महिन्यात एकाही कार्ड धारकाला राशन मिळाले नाही असे आरोप गावकर्यांनी केले आहे,व तहसीलदार जिवती यांना निवेदन देऊन याची योग्य ती चौकशी करून गावकर्यांना दर महिन्याला राशन मिळेल अशी व्यवस्था करून द्या अशी मागणी जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी केली आहे यावेळी पद्मावती येथील नागरिक मोठ्या संख्येने उपास्थित होते.