पुणे फेस्टिवल महिला महोत्सवाच्या मिसेस पुणे फेस्टिवल 2022 स्पर्धेची प्राथमिक फेरी पुण्यात संपन्न

🔸मिसेस पुणे फेस्टिवल 2022ची महाअंतिम फेरी 8 सप्टेंबर 2022 रोजी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.9सप्टेंबर):- पुणे फेस्टिवल 2022 अंतर्गत मिसेस पुणे फेस्टिवल 2022 स्पर्धेच्या रंगीत तालमीचे आयोजन पुण्यातील येथे नुकतेच करण्यात आले होते. या महाअंतिम फेरीच्या रंगीत तालीम प्रसंगी पुणे फेस्टिव्लचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, पुणे फेस्टिवल चे प्रमुख संयोजक डॉ.सतीश देसाई , पुणे फेस्टिवल कमिटीतील ज्येष्ठ संयोजक काका धर्मावत, पुणे फेस्टिवल महिला महिला महोत्सवाच्या मिसेस पुणे च्या संयोजिका अमृता जगधनी, हॉटेल राजेशाही चे संचालक निलेश दमिष्टे उपस्थित होते.

या महिला महोत्सवाच्या मिसेस पुणे 2022 स्पर्धेसाठी एकूण 125 स्पर्धकांपैकी 10 स्पर्धकांची निवडमहाअंतिम फेरीसाठी करण्यात आली आहे. या स्पर्धकांची प्राथमिक फेरी व ग्रुमिंग राऊंड आयोजकांकडून घेण्यात आला होता. कार्यक्रमाची महाअंतिम फेरी पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे रात्री 9 वाजता होणार आहे . पुणे फेस्टिवल मिसेस पुणे 2022 स्पर्धेसाठी हॉटेल राजेशाही हे फूड पार्टनर आहेत.

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED