मराठवाड्यात मुसळधार पाऊस; वीज कोसळून दोन ठार

✒️बीड,जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.9सप्टेंबर):-मराठवाड्यात गेल्या 24 तासात नांदेड, बीड, लातूर, औरंगाबादेत मुसळधार पाऊस झाला. या पावसात वीज कोसळून दोघे जण मरण पावल्याची माहिती पोलिसांनी दिली. भोकर तालुक्यात पिंपळढव येथील ललिता सुभाष पोल ही 40 वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह शेतात काम करीत असताना दुपारी अडीचच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह पावसाला प्रारंभ झाला. या वेळी वीजेचा लोळ पडून महिला मरण पावली. या घटनेत सुभाष पोले हे जखमी झाले आहेत. सुदैवाने दोन्ही मुलांना कोणतीही इजा झाली नाही. याबाबत प्रशासनास माहिती देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

लातूरला वीज पडून मृत्यूच्या घटना.!
____________________________

लातूर जिल्ह्यात दगडवाडी येथे संध्याकाळी सहा वाजता वीज पडल्याने विनायक रामा भोसले यांची म्हैस मरण पावली. तर दापका येथील बाबूराव खंडू सुरवसे (50) हे शेतात काम करीत असताना वीज पडून मरण पावले.

बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस..!
____________________________

बीडसह पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, धारूर, वडवणी आणि शिरूर कासार या तालुक्यात जोरदार पाऊस झाला. शिरूर तालुक्यात सर्वाधिक 56.2 मि.मी.पावसाची नोंद झाली तर चार मंडळांत अतिवृष्टी झाली. परभणीतही महिनाभराच्या कालखंडानंतर पावसाने हजेरी लावली.

औरादला ढगफुटी..!
_________________________
लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले असून, औराद शहाजानी येथे दोन तासात तब्बल 145 मीमि पावसाची नोंद झाली आहे. ही ढगफुटी असल्याचे सांगण्यात आले. शहरातील लातूर – जहिराबाद मार्गावर पाणी साचले आहेत. निलंगा, अनंतपाळ तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला.

बीड, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED