सामान्य कुटुंबातील अजय कुमावत आज मोठ्या पडद्यावर

✒️जळगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

जळगाव(दि.9सप्टेंबर):-खानदेशातील चर्चेत असलेले लोकप्रिय नाव म्हणजे अजय कुमावत हे आता लाखो लोकांच्या मनावर राज्य करत आहे…

अजय कुमावत हा देखील सामान्य कुटुंबातून वर आलेला आहे त्याचे दहावीपर्यंत शिक्षण हे सिद्धिविनायक विद्यालय जळगाव येथे घेतलेले आहे व बारावी ला आर आर कॉलेज जळगाव येथे घेतलेले आहे एक्टिंग क्षेत्रात आवड असल्याकारणाने त्याने एक्टिंगचा छंद लावून घेतला व व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली त्याचे व्हिडिओ लोकांना आवडू लागले व पुढे चालून खानदेशी सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे सचिन भाऊ कुमावत यांच्या साथीने त्याने 2021 ला त्याचे पहिले अहिराणी गाणे प्रदर्शित झाले व तेव्हापासून त्याचा एक्टिंग क्षेत्रातील प्रवास सुरू झाला…

अजय कुमावत चे वाढते नाव व वाढते चाहते बघून महाराष्ट्राचे राज्यमंत्री अतुल सावे साहेब यांनी देखील अजय कुमावत चा सत्कार केला व बरेच पॉलिटिकल व लीडर त्याचे कौतुक करू लागले..

आत्या समजाडी ठेव तूण्या पोऱ्यले , भाड्याने घर, झिंगालाला काव काव व मनात दिलवर घाव तु करणीय असे बरेच सुपरहिट आहीरणी गाणे मध्ये अजय कुमावत दिसून आले आहे त्यांना एक्टिंग क्षेत्रात साथ देणारे ओम साई मोटर स्कूल संस्थापक किशोर दादा पांडे , नितीन दादा पांडे , खान्देश सुपरस्टार सचिन भाऊ कुमावत खानदेशी सिंगर भैय्यासाहेब मोरे प्रमोद महाजन हरीश कुंभार व अंकुश भाऊ कुमावत युवा मंच संस्थापक अंकुश भाऊ कुमावत यांच्या मार्गदर्शनाने तो आज इथ पर्यंत पोहचला आहे.

लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED