दिव्यांग यांना घरकुल यादील अनुक्रमांक नुसार न घेता प्रथम प्राधान्य देण्यात यावे

86

🔹प्रहार चे ना.ख.गटविकास अधिकारी यांना निवेदन

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.9सप्टेंबर):-केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने २०२२पर्यत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वांना हक्काची घरे देण्याचा संकल्प बोलुन दाखविला असला तरी काही ग्रामपंचायत मध्ये *प्र.पत्र ड*.मधिल दिव्याग कायदा २०१६ ची अंमलबजावणी करुन दिव्याग लाभार्थी यांना अनुक्रमांक नुसार न.घेता त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे.तसेच ज्या दिव्यांगाना घरकुल चा लाभ मिळाला नाही त्यांना घरकुल देण्यात यावे.व ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांगांना गावपातळीवर दिव्यांग २०१६ अधिनियम कायद्या नुसार २०० स्के.फुट जागा व्यवसाय करण्यासाठी देण्यात यावी.

जेणेकरुन त्या ठिकाणी छोटासा व्यवसाय करुण स्वताचे जिवन व परिवाराचा उदार्निवाह होऊ शकेल.या विषयाची तातळीने अंमलबजावणी करण्यात यावी दिव्यांगाना न्याय न मिळाल्यास प्रहार अपंग क्रांती आदोलन चे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष प्रदिप रघुते सह दिव्याग बाधवं यांच्या उपस्थितीत अनिश्चीत वेळी आंदोलन करण्यात येईल.*मा.गटविकास अधिकारी तसेच *प्रितम चर्जन कनिष्ठ प्रशासन अधिकारी, संजय लव्हाळे सहायक प्रशासन अधिकारी, नितेश अंभोरे**यांना प्रहार संपर्क प्रमुख चंदु खेडकर.जिल्हा व शहर प्रमुख अमरावती शाम राजपुत यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले..त्यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दिव्याग .प्रदिप रघुते.अशोक बनोटे.सिध्दार्थ कार्दिक.सचिन खंडागळे.अतुल शेंवडे.आकाश मगर.गजानन मासोदकर.सह दिव्याग बाधव हजर होते..*