जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त संजय सर यांचे अभिष्टचिंतन

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमुर(दि.10सप्टेंबर):-चंद्रपूर जि.प.चा जिल्हा शिक्षक पुरस्कार चिमूर पंचायत समितीमधील जि.प.उच्च प्राथमिक शाळा, सोनेगाव (वन) शाळेतील उपक्रमशिल , विद्यार्थीप्रिय शिक्षक संजय सर यांना प्राप्त झाला.विदयार्थी वर्गासाठी सातत्याने ते नवनवीन प्रयोग करीत असतात.शाळेत विविध उपक्रम राबवित असतात.

अशा प्रयोगशील, उपक्रमशील संजय सर यांना जि.प.चा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिक्षक भारती व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना स्मृतीचिन्ह,सन्मानपत्र व पुस्तक देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षक भारती विभागीय सरचिटणीस व वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे सचिव सुरेश डांगे, शिक्षक भारती चिमूर तालुका अध्यक्ष रावण शेरकुरे, तालुका सचिव कैलास बोरकर,प्रतिष्ठानचे सदस्य मनोज राऊत,आकाश भगत आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED