२३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल १८ सप्टेंबरला भोसरीत रंगणार

✒️पुणे(पुरोगामी न्युज नेटवर्क)

पुणे(दि.10सप्टेंबर):- नक्षञाचं देणं काव्यमंच, मुख्यालय, भोसरी, पुणे ३९ वतीने कै.धोडींबा फुगे मैदान सभागृह, दिघीरोड,भोसरी येथे महाराष्टातील भव्य अशी २३ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व स्पर्धा पारीतोषिक वितरण आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वा सुरु होणार आहे.या सोहळ्याचे उदघाटन विचारवंत प्रभाकर आवारी, चंद्रपूर यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी,शिक्षणतज्ञ उदय सर्पे-सिंधुदुर्ग हे उपस्थित राहणार आहे. यावेळी उद्योजक कृष्णकुमार गोयल, आमदार महेशदादा लांडगे, नगरसेवक अजित गव्हाणे, कामगारनेते डाॅ.कैलास कदम, अभियंता वसंत टाकळे- रत्नागिरी, अॅड.नितीन लांडगे, उद्योजक विजय फुगे,अमर फुगे, सुखदेव सोनवणे,उद्योजक योगेश आमले, नितीनशेठ लोणारी,सचिन चिखले, किरणताई मोरे इ.अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा होणार आहे.

यावेळी संपूर्ण महाराष्टातील आलेल्या कवी कवयिञींची बहारदार कवितांनी श्रावणी काव्यमैफल रंगणार आहे. ह्यावेळी महाराष्टातील मानाची समजली जाणा-या श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे. साहित्यसेवा करणा-या दिवाळी अंक स्पर्धेचे बक्षिस वितरण होणार आहे. समाजसेवक सावळेराम रखमाजी डबडे कविरत्न पुरस्कार कवी रामचंद्र पंडित ,सातारा यांना प्रदान करण्यात येणार आहे.तसेच कवितेची व साहित्याची सेवा करणा-या कट्टर नक्षञांना नक्षञ गौरव पुरस्कार संपुर्ण महाष्टातून निवडलेल्या देण्यात येणार आहे.त्यात कविवर्या सौ.वृषाली टाकळे, रत्नागिरी,कवी यशवंत घोडे, जुन्नर,कविवर्या प्रा.शितल कांडलकर,नागपुर,कवी मोहन घुले,भोसरी,कवी यवनाश्व गेडकर, चंद्रपूर, कविवर्या सौ.पुष्पलता कोळी, जळगाव,कवी डाॅ.प्रा.सत्येंद्र राऊत, उस्मानाबाद,कवी डाॅ.लक्ष्मण हेंबाडे,सोलापुर,कविवर्या सौ.छाया ब्रम्हवंशी,गोदिंया,कविवर्या प्रा.अरुणा डांगोरे, नागपूर,कवी ज्ञानेश्वर काजळे, जुन्नर,कवी मंदार सांबारी, मालवण, कविवर्या सौ.भारती तितरे, गडचिरोली, कवी प्रा.दिलीप गोरे, चाकण इ.गौरविण्यात येणार आहे.

कविंना आदर व सन्मान मिळावा.त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणुन गेली २३ वर्षे नक्षञाचं देणं काव्यमंचवतीने महाराष्टाभर हे कार्य सुरु आहे.या संस्थेने अनेकांना सन्मानाचे व्यासपीठ मिळून देऊन कविंचा व कवितेचा सन्मान केला आहे.कविंच्या काव्यलेखनीला धार मिळण्यासाठी,काव्यप्रतिभेला फुलविण्यासाठी काव्यमंच हे अनेक वर्षांपासुन प्रभावी कार्य करत आहे.या कार्यक्रमाचे संयोजन आयोजन नक्षञाचं देणं काव्यमंचचे संस्थापक राष्टीय अध्यक्ष प्रा.राजेंद्र सोनवणे यांनी उत्तमरित्या केले आहे.यात सर्वांना विनामूल्य व मुक्त सहभाग आहे.

पुणे, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED