नावात प्रकाश असणारे प्रकाश शिंगाडे दोन वर्षापासून अंधारात

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.12सप्टेंबर):-अंधश्रद्धा निर्मूलन समिती गंगाखेड तालुका कार्याध्यक्ष पद गेल्या पंधरा वर्षापासून प्रकाश शिंगाडे यांच्याकडे असताना संत, महापुरुषांच्या विचाराचा वारसा सांगत वैचारिक चळवळीमध्ये मोठ्या उत्साहाने महापुरुषांच्या विचाराचा वारसा चालवत असताना बहुजन समाजाला अंधश्रद्धेतून वैज्ञानिक प्रयोगाच्या माध्यमातून प्रकाश देणारे प्रकाश शिंगाडे यांच्या घरातील वीज कनेक्शन भावाच्या नावावर असल्यामुळे ते वीज कनेक्शन लाईट एमएसईबी विभागाने बंद केल्यामुळे सलग दोन वर्षापासून प्रकाश शिंगाडे व त्यांचा परिवार अंधारामध्ये जीवन जगताना दिसून येत आहेत.

जीवनामध्ये प्रकाश शिंगाडे उदरनिर्वाच साधन म्हणून छोटासा वडापावचा उद्योग करतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात.अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रबोधन करणारे प्रकाश शिंगाडे यांच्यावर देव कोपला की काय ? देव म्हणाव तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते?असा प्रश्न उपस्थित होतो. इतर बहुजन समाजाला प्रकाश देणारे प्रकाश शिंगाडे गेल्या दोन वर्षापासून दुसरीकडे मोबाईल चार्जिंग करून त्याच चार्जिंग वर घरामध्ये घराच्या प्रकाशामध्ये आपली रात्र काढतात.एक दिवस लाईट नसेल तर जीवाची तगमत होते! पण शिंगाडे कुटुंबीयांनी चक्क दोन वर्षापासून घरात लाईट नसल्यामुळे आजही परिवार कसे जीवन जगत असावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

घरातील संपूर्ण लाईट बंद असल्यामुळे प्रकाश शिंगाडे यांनी लाईट साठी अर्ज करून खूप दिवस झाले तरी या घरामध्ये लाईट एमएसईबी विभागातील कर्मचारी लाईन मॅन लाईट देण्यासाठी परवानगी देत नाहीत प्रकाश शिंगाडे यांनी एम एस बी कडे अनेक वेळा खूप चकरा मारल्या तरीही वीज कनेक्शन मिळत नाही उदरनिर्वासाठी स्व-कष्टातून सामोरे जाणारे प्रकाश शिंगाडे यांच्या भावना कोणीतरी समजून घेईल का? त्यांच्या कुटुंबात लाईट येण्यासाठी कोणी मदतीचा हात देईल का. परंतु प्रकाश शिंगाडे यांच्या भावाच्या नावावर लाईट बिल असताना प्रकाश शिंगाडे यांना वीज कनेक्शन देण्यात येत नाही या वीज कनेक्शनच्या प्रश्नाकडे कोणीतरी समाज बांधव किंवा सामाजिक कार्यकर्ते यांच्या भावनेला दाद देतील का? असं प्रकाश शिंगाडे परिवाराला मनापासून वाटतं पण हा परिवार बोलून कधी दाखवत नाही आपली कौटुंबिक निराशा कोणापुढेही मांडत नाहीत.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED