तलवाडा पोलिसांचा कल्याण सट्टा मटक्याला आशीर्वाद

34

✒️गेवराई(शेेख आतिख, तालुुका प्रतीनीधी)

मो:-9767177932

गेवराई(5 जुलै):-तलवाडा पोलीस कोरोना संकट काळात सर्व नियम काटेकोरपणे राबवित असले तरी अवैद्य कल्याण सट्टा मटका व्यवसायाकडे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या चर्चेतील सत्य शोधून पोलीस अधीक्षकानी पुडील कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

देशाच्या राजधानी दिल्ली सह राज्यात कहर माजविणाऱ्या कोरोना महामारी मुळे गेल्या काही महिन्या पासुन केंद्र व राज्य शासनाने लाॅक डाॅऊनच्या सूचना दिल्या आहेत. त्या नुसार पोलिस बांधवांनी स्वताच्या जिवाची तमा न बाळगता परिस्थिति योग्य पध्दतिने हाताळली होती.

कोरोनाच्या संकट काळात तलवाड़ा पोलीसांनी बजावलेल्या योग्य भूमिका मुळे पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्रच्या वतीने तलवाड़ा पोलीस ठाण्याच्या काही पदाधिका-यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव ही करन्यात आलेला आहे परंतु ज्या ठिकाणी आर्थिक ऊलाढालीचा विषय येतोय त्या त्या ठिकाणी मंग गर्दी व जमाव जमत आसलं तरी तलवाड़ा पोलीसांना चालते कसे आसा सवाल नागरिकातुन उपस्थिति खेला जात असुन तलवाड़ा पोलीस ठाणे हाद्दीत आज पर्यंत कोरोना मुक्त परिस्थिति आसली तरी काही बाबतीत तलवाड़ा पोलीसांची भूमिका आम्ही मारल्या सारखे करु तुम्ही रडल्या सारखे करा आशा पध्दतिची आसल्याचे नागरिकातुन बोलले जात असुन जिल्हाधिकारी साहेबांनी शासन आदेशा नुसार लाॅक डाॅऊन मध्य दिलेल्या स्थीलतेतुन तलवाड़ा परिसरात कलम 144 चा फज्जा ऊडाल्या सदृश्य परिस्थिति तलवाड़ा पोलीस ठाणे हाद्दीत सर्वत्र दिसुन येत असुन तलवाड़ा परिसरातील चहा फराळाचे हाॅटेल व किराणा दुकान आदेशा नुसार वेळेवर बंद होत आसले तरी कल्याण सट्टा मटका नावाचा जुगार विविध ठिकाणी सरास सुरु आसल्याचे चित्र पाहन्यास मिळत असुन सकाळी सहा ते रात्री दहा वाजे पर्यंत मटका बुक्की खचा खच भरलेले दिसुन येत आसतांना आर्थिक ऊलाढालीची दरवळ तलवाड़ा पोलीसांना आकर्षित करते कि काय आसा प्रश्न सुज्ञ नागरिकातुन उपस्थित केला जात असुन तलवाड़ा पोलीस ईतर व्येवसाईकांना जसे नियमावली दाखवते तशी परिस्थिति नुसार मटका दारु व ईतर धंद्याना लागु होत नाही का मटक्याच्या बुक्की मध्य मटक्याचा चार्ट एका व्येक्तीच्या हातात आसतो तर आणेक जन एकत्रीतरित्या त्यात मुंडके खुपसुन बस्तात मटका बुक्कितील गर्दी तलवाड़ा पोलीसांना दिसत नाही का आसा प्रश्न निर्माण होत असुन बाकी परिस्थिति वेरी गुट असुन कल्याण सट्टा मटक्यालाच सुट कशी?