आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराचे आयोजन

43

🔸नाव नोंदणीस प्रारंभ

✒️नांदेड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नांदेड(दि.12सप्टेंबर):-मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या मेंदूचे विकार असणाऱ्या १८ वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दि. २२ ते २४ सप्टेबर या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठीच्या नोंदणीस प्रारंभ झाला असून गरजूंनी त्वरित नोंदणी करावी असे आवाहन मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी केले आहे.

मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि.जे.वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दरवर्षी दोन वेळा १८ वर्षाच्या आतील मेंदुचे विकार असणाऱ्या मुला-मुलींचे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येते.

आरोग्य शिबीरातील रूग्णांवर मुंबईच्या प्रसिध्द बाल मस्तिष्करोग तज्ञ डॉ. अनैता हेगडेसह तब्बल ३५ डॉक्टरांची टीम आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत. नेहमीप्रमाणे आवश्यकतेनुसार मोफत एमआरआय, सिटी स्कॅन, 2-डी इको, ईईजी, ईसीजी, एक्सरे व पॅथॉलॉजीकल तपासण्या करण्यात येणार आहे.

—-box—-
*नोंदणीस प्रतिसाद*
प्रतिवर्षाप्रामाणे यावर्षीही आरोग्य शिबिरासाठीच्या नोंदणीस प्रतिसाद मिळाला असून ज्या रुग्णांनी अद्याप नोंदणी केलेली नाही अशांनी प्रत्यक्ष आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात प्रत्यक्ष अथवा डॉ. मनीषा तिवारी (8208114832) व संजय रुमाले (9067377520) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या रुग्णांची यापूर्वी नोंदणी झालेली आहे अशा रुग्णांनी पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.
———–

आरोग्य शिबीराचे हे बारावे वर्ष असून आता पर्यंत झालेल्या एकवीस आरोग्य शिबीराचा तब्बल ५ हजार पेक्षाही अधिक रूग्णांना लाभ झाला आहे. आरोग्य शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांना सहा महिन्यांची म्हणजेच आगामी आरोग्य शिबिरापर्यंतची मोफत औषधी देण्यात येते तसेच आवश्यकते नुसार रुग्णांना दररोज शाळेतील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. एम. जी. बजाज रिहॅब्लीटेशन सेंटर येथे फिजीओ थेरपीची सोय निशुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या पालकांसाठी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीमार्फत चहापाणी, नाष्टा व भोजनाची मोफत व्यवस्था केली जाते.

आरोग्य शिबीर यशस्वी व्हावे यासाठी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, कमल कोठारी, डॉ. लक्ष्मीकांत बजाज, जयप्रकाश काबरा, बनारसीदास अग्रवाल आदींच्या मार्गदर्शनाखाली मूख्याध्यापक नितीन निर्मल तसेच आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.