वैष्णवी गोरे हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीच हवी-नवनाथ वाघमारे

  56

  🔺 गोरे कुटूंबियांची अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी घेतली सांत्वन पर भेट

  ✒️अतुल उनवणे(जालना जिल्हा प्रतिनिधी)

  मो:-9881292081

  जालना(दि:-5 जुलै):-अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी गोरे व कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत सोबत ठाम उभे राहणार अशी ग्वाही गोरे कुटुंबास देण्यात आली.नराधम आरोपी शेख अल्ताफ शेख बाबूला फाशीची कठोर शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करणार अशी ग्वाही श्री. नवनाथ वाघमारे यांनी दिली.

  तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वतीने वैष्णवी गोरे व कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन देण्यात आले.
  यावेळी त्यांच्या समवेत, जिल्हा उपाध्यक्ष तथा मा. सरपंच श्री. राधाकिसन माने, जिल्हा उपाध्यक्ष तथा मा. सरपंच श्री.सुधाकरराव घेर,जेष्ठ सहकारी श्री. रुस्तुमराव पुंड, अॅड.मधुकरराव मोरे, सरपंच श्री.त्र्यंककराव हजारे, तालुकाध्यक्ष तथा सरपंच श्री. रंगनाथराव उकंडे, श्री. शिवाजीराव तराशे, प्रा.श्री.जगन्नाथराव रासवे, डॉ.तौर, श्री.अशोक खरात, श्री. गोविंदराव अहिरे, श्री.भरतराव किटाळे, श्री.गायके साहेब, श्री. संभाजी बनकर, श्री.शाम उकंडे, यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.