बाभुळगाव येथील अवैध धंदे त्वरित बंद करा – भीम टायगर सेना

33

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवताळल(दि.12सप्टेंबर):-बाभुळगाव तालुक्यात अवैध धंदे त्वरित बंद करा अशी मागणी भीम टायगर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण तीव्र प्रमाणात वाढतच आहे.
अख्ख्या देशातील तरुणाई परेशान आहे की नेमकं पोट भरावे तरी कसे ??

शासनाने यासाठी काहीतरी उपाययोजना म्हणून लीगल म्हणजेच कायदेशीर कामांची उपलब्धता करायला हवी पण हे शासन आणि प्रशासन केवळ नकली कामांना म्हणजेच इलिगल कामांना परवानगी देते.

आणि कायदेशीर कामांची ऐसी तैसी करुन खाजगीकरण करुन तरुणाईला बेरोजगार बनवून ठेवत आहे.

याचा परिणाम असा झाला की युवा पिढी वाममार्गाने वाटचाल करत आहे व दारु, गांजा, जुगार, मटका, रेती तस्करी व सर्वच नंबर 02 च्या धंद्यामागे धाव घेत आहे.

यामुळे देशात अराजकता निर्माण होऊन कालांतराने महापुरुष, समाजसुधारकांचे विचार मातीत मिसळून जातील व सारा तरुण वर्ग दारु, गांजा, अफीम, जुवा, मटका यांच्याच नादी लागेल व आपले आयुष्य बरबाद करुन सोडतील.

कारण सरकार देशी दारु विक्रेत्याला परवाने वाटप करतात. आणि पोलीस प्रशासन त्यांच्या कडून हप्ता वसुली म्हणून ही कुठं तरी लोकशाहीची व संविधानाची अवहेलना आहे म्हणून याला वाचा फोडणे ही सर्वच भारतीयांची जबाबदारी आहे.

जर का देशात अशीच परिस्थिती सुरु राहिली तर कालांतराने पुन्हा एकदा गुलामी आल्याशिवाय राहणार नाही म्हणून तरुणांनी कारण युवा पिढीच देशात परिवर्तन घडवून आणू शकतात.

युवा-वायू युवा पिढी जे करु शकतील ते कोणीच करु शकत नाही म्हणून सर्वांना विनंती करतो की, कायदेशीर कामांकडे धाव घ्या, समाजाचा विनाश करणाऱ्या अवैध धंद्याच्या दूर रहा व कायदेशीर कामांची कमतरता जर जाणवत असेल तर त्यासाठी सर्वांनी रस्त्यावर उतरून कायदेशीर मार्गाने कामांची मागणी करा.

सरकारी नोकऱ्याचे प्रमाण अतिशय कमी करुन सर्वच क्षेत्रात खाजगीकरण झालेले दिसून येत आहे आणि आपण नुसत्या झोपा काढत आहोत म्हणून शासनाची झोप उडविण्यासाठी जागे व्हा व संविधान म्हणजेच आपलं ऑक्सिजन त्या संविधानास संरक्षक कवच म्हणून त्याची जपणूक करा कारण ते जर नष्ट झाले तर तुमच्या गड्यात गाडग आणि कमरेला फडा लावल्या शिवाय हे सरकार राहणार नाही म्हणून उठा, शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.
अशा आशयाचे निवेदन विशालकुमार राऊत
(भीम टायगर सेना युवा प्रवक्ता
तथा विदर्भ प्रसिध्दी प्रमुख) दिले.