वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारणी व सर्कल निरीक्षकांची बैठक संपन्न…

    40

    ✒️जालना(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

    जालना(दि.13सप्टेंबर):- वंचित बहुजन आघाडी येणार्‍या जालना जिल्ह्यातील सर्व निवडणुका जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे पश्चिम यांच्या अध्यक्षतेखाली व अँड बाळासाहेब आंबेडकर आणि रेखाताई ठाकुर यांच्या आदेशानुसार व जालना जिल्हा प्रभारी जितेंद्र सिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली लढविणार आहे त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी जालना जिल्हा कार्यकारणी व सर्कल निरीक्षकांची बैठक जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 13/09/2022 रोजी दुपारी . 03:00 वा जालना जिल्हा संपर्क कार्यालय येथे बैठक घेण्यात आली.

    यावेळी डेव्हिड घुमारे, विष्णु खरात,ज्ञानेश्वर जाधव, शेख लालाभाई,प्रा संतोष आढाव, राजेंद्र खरात, प्रकाश बोर्डे,निलेश साळवे, धम्मा हिवराळे, गौतम वाघमारे, राहुल सरोदे,भिकाजी जाधव, मुरली बोबडे, कैलास जाधव, विकास लहाने, प्रकाश मगर, सुरज खंडाळे, शाम खरात,दिपक काहीरे, मिलींद पारखे, सर्जेराव हिवाळे, राजेंद्र वांजुळे, भीकन राउत, भानुदास साळवे, सह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.