आकांक्षा आंधळे हिचे नीट परीक्षेत घवघवीत यश

64

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.13सप्टेंबर):-वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून यामध्ये तालुक्यातील आंधळेवाडी येथील पंचायत समिती कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक बापुराव आंधळे यांची कन्या आकांक्षा आंधळे हिने नीट परीक्षेत ६३१ गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. मेडिकलला जाण्याचे तिचे स्वप्न आता पुरे होणार आहे. प्रयत्नांची परकाष्टा करून यश संपादन केले आहे. त्यामुळे तिचे विशेष कौतुक होत आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आष्टी तालुक्यातील आंधळेवाडी येथील आकांक्षा आंधळे हिने ७२० पैकी ६३१ गुण मिळवत यश संपादन केले आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशातील नीट परीक्षा अत्यंत महत्त्वाची समजली जाते. या अभ्यासक्रमासाठी १७ जुलै रोजी परीक्षा झाली होती. विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्कंठा लागून राहिलेल्या या परीक्षेचा निकाल बुधवारी वेबसाइटवर दुपारी जाहीर झाला. आकांक्षा ने अभ्यासात आपली चुनुक दाखवली आहे. १० वीत ९८.६० गुण तर १२ वीला ९५ गुण मिळवले होते. सुरुवातीपासूनच अभ्यासाची आवड काहीतरी करुन दाखवणयाची जिद्द असल्याने विचलित न होता नीट परीक्षेत‌ घवघवीत यश मिळवले आहे. मुलीच्या या यशामुळे सगळे कुटुंबीय आनंदित झाले असून आपल्या मेहनतीला फळं आल्याचे तिच्या आई वडिलांनी सांगितले.

प्रत्येक गोष्ट आपल्या स्वतःच्या घरावर अवलंबून असते, ज्याप्रमाणे आपण घरातील वातावरण मुलांना देऊ, त्याचप्रमाणे मुलांची कृती आणि भूमिका असतात असे आकांक्षा चे आई वडील सांगतात. त्यामुळे मनाशी ध्येय असले तर गरिबी प्रगतीच्या आड येत नाही आकांक्षा हि सुशिक्षित कुटुंबातील असून वडील पंचायत समितीमध्ये कनिष्ठ सहाय्यक या पदावर कार्यरत आहेत. तिच्या यशाबद्दल आंधळेवाडी ग्रामस्थांनी सत्कार केला.